Chandrabhaga River Pandharpur  Saam tv
महाराष्ट्र

Chandrabhaga River Flood : चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली, आषाढीवर पुराचे सावट

Pandharpur News: उजनी धरणातून ४० हजार तर वीर धरणातून १५ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. आज सायंकाळपर्यंत पंढरपुरात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या चंद्रभागा नदी २५ हजार पेक्षा अधिक क्युसेकने वाहत आहे

भारत नागणे

पंढरपूर : मागील दोन- तीन दिवसांपासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने उजनी धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपुरात चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे आज चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिकासह अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. 

पंढरपूरची आषाढी यात्रा ६ जुलैला आहे. या अनुषंगाने विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. तर पुढील काही दिवसात भाविकांची गर्दी अधिक होणार असून काही दिवसांनी पायी वारी करणारे वारकरी देखील पंढरपुरात दाखल होतील. मात्र आषाढीच्या तोंडावर चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास चंद्रभागेला पूर राहण्याची शक्यता आहे. 

मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग 

उजनी धरणातून सध्या ४० हजार तर वीर धरणातून १५ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. दरम्यान आज सायंकाळपर्यंत पंढरपुरात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या पंढरपुरात चंद्रभागा नदी २५ हजार पेक्षा अधिक क्युसेकने वाहत आहे. पूरस्थिती गंभीर झाल्यास चंद्रभागा नदीत स्नान करण्यास भाविकांना मनाई करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान नदीकाठी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आल्या आहेत.  

कायमस्वरूपी मासं विक्री बंदीसाठी आंदोलन
महाराष्ट्रातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र पंढरपूर आहे. या पंढरपूर तीर्थक्षेत्री आषाढी वारीसाठी दहा दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र पंढरपुरात केवळ १० दिवस नव्हे; तर कायम स्वरुपी मांस व मद्य विक्री बंद व्हावी; अशी मागणी आता बजरंग दल यांच्या माध्यमातून होत आहे. कायम स्वरुपी मांस व मद्य विक्री बंद व्हावी. यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या माध्यमातून आज निदर्शने करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT