Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: भाविकांसाठी आनंदाची बातमी! घरबसल्या करा 'विठुरायाच्या' पूजेचं बुकिंग, १ ऑक्टोंबरपासून नवीन सुविधा; वाचा सविस्तर...

Vitthal Rukmini Mandir Pooja Online Booking: पंढरपुरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. याबाबत आता मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला असून या पूजेची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.

भारत नागणे

पंढरपूर, ता. २९ ऑगस्ट २०२४

विठ्ठल भक्तांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पंढरपुरच्या विठुरायाचे, रखुमाईची पूजा आता भाविकांना घरबसल्या नोंद करता येणार आहे. विठ्ठल- रुक्मिणी मंदिर प्रशासनाने ही नवी संगणक प्रणाली सुरू केली असून भाविकांना पूजेची नोंदणी या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे आता पुजेच्या नोंदणीसाठी पंढरपुरला येण्याची आवश्यकता नाही, असे मंदिर समितीने सांगितले आहे.

विठुरायाच्या पुजेचे ऑनलाईन बुकिंग!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंढरपुरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजा मिळवण्यासाठी भाविकांची मोठी मागणी असते मात्र त्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेकवेळा आधी नंबर लाऊनही भाविकांना या पूजेचा लाभ घेता येत नाही. याबाबत आता मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला असून या पूजेची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.

कशी कराल ऑनलाईन नोंदणी?

यासाठी आता मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी महत्वाचा निर्णय घेत संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना घर बसल्या ऑनलाइन पद्धतीने पूजा नोंद करता येईल.

या संकेतस्थळावर क्लिक करुन करा पूजेची नोंदणी: Shri Vitthal Rukmini Mandir, Pandharpur

दरम्यान, विठुरायाच्या पुजेसाठी राज्यातूनच नव्हेतर परराज्यातूनही अनेक भाविकभक्त येत असतात. त्यामुळे या पुजेच्या नोंदणीसाठी भाविकांना पंढरपुरमध्ये यावे लागत होते. तसेच अनेकदा ऑनलाईन पूजा बुकिंग करण्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूकही करण्यात आल्याचे प्रकार समोर आले होते. अशा गोष्टींना आता आळा बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पविरोधात मोठं आंदोलन, 70 लाख आंदोलक रस्त्यावर , नेमकं कारण काय?

Liver disease warning: लिव्हर खराब झाल्यावर त्वचेवर दिसतात 'हे' बदल; गंभीर गुंतागुंत होण्यापूर्वी लक्ष द्या

Manoj Jarange Effect : जालना पोलिस पाटील भरतीत ‘जरांगे इफेक्ट’! मराठा समाजाच्या उमेदवारांचा डंका

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Nashik Tourism : नाशिकला गेलाय? मग 'हा' ऐतिहासिक किल्ला नक्की पाहा

SCROLL FOR NEXT