Ujani Dam Saam tv
महाराष्ट्र

Ujani Dam : ४४ वर्षानंतर उजनी धरणाची निच्चांकी पाणी पातळी; पाणी योजना अडचणीत

Pandharpur News : पाऊस कमी झाल्यामुळे धरणात देखील पुरेसे पाणी साचले नाही. धरणात जे पाणी आहे. ते देखील बाष्पीभवनामुळे कमी होत चालले असल्याचे चित्र राज्यात सर्वत्र पाहण्यास मिळत आहे

भारत नागणे

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणाने तळ गाठला आहे. मे अखेर धरणाची पाणी पातळी गेल्या ४४ वर्षानंतर प्रथमच निच्चांकी पातळीपर्यंत गेली आहे‌. सध्या उजनी धरणात वजा ५९.३० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणावरील सर्व पाणी पुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत.

पाऊस कमी झाल्यामुळे धरणात देखील पुरेसे पाणी साचले नाही. धरणात जे पाणी आहे. ते देखील बाष्पीभवनामुळे कमी होत चालले असल्याचे चित्र राज्यात सर्वत्र पाहण्यास मिळत आहे. हीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाची (Ujani dam) झाली आहे. उजनी धरणात गाळ आणि वाळू मोठ्या प्रमाणावर साचल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. यामुळे यंदा धरण कोरडे पडल्यामुळे धरणातील गाळ काढावा; अशी मागणी होत आहे. 

दीड महिना तरी पाण्याची समस्या 

२०१४ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी धरणाची पाणी पातळी जूनमध्ये वजा ५९.०५ टक्केपर्यंत खाली गेली होती. (Solapur) यंदा मात्र मे अखेर धरण निच्चांकी पाणी पातळीवर गेले आहे. सरासरी जुलैपासून धरणात पाणी येण्यास सुरवात होते. त्यामुळे आणखी दीड ते दोन महिने ‌पाणी कसे पुरवायाचे याची चिंता लागली आहे. पावसाच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Credit Card : आरबीआयचा क्रेडिटधारकांना मोठा झटका; ही सुविधा झाली बंद, काय आहेत नवीन गाईडलाइन?

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका करु नये?

Maharashtra Live News Update: पुण्यात पावसाचा कहर, बंगळूर-पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Pune Crime: साईड नाही दिली, भररस्त्यावर घायवळ गँगच्या लोकांनी घातली गोळी

Hair Care Tips: बदलत्या हवामानामध्ये 'या' चुका टाळा, अन्यथा तुमचे केस गळणे कधीच थांबणार नाही

SCROLL FOR NEXT