Ujani Dam Saam tv
महाराष्ट्र

Ujani Dam : उजनी धरणातून विसर्ग वाढवला; एक लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग, पंढरपुरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता

Pandharpur News : भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पंढरपुरात पुराचा धोका निर्माण झाला आहे. सध्या पंढरपुरात ७३ हजार क्युसेक इतक्या विसर्गाने चंद्रभागा प्रवाहित झाली आहे

भारत नागणे

पंढरपूर : भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे कालपासून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान आज दुपारपासून धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून तब्बल एक लाख २५ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीमा नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात सर्वंडून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे जवळपास सर्वच नदी- नाल्यांना पूर आला असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर भीमा खोऱ्यात म्हणजे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस होत असल्याने उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पुन्हा एकदा भीमा काठी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 

दुपारपासून पाण्याच्या विसर्गात वाढ 

कालपासून उजनीतून भीमा नदी पात्रात एक लाख क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. मात्र उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने विसर्गामध्ये वाढ करून तो आता एक लाख २५ हजार इतका करण्यात आला आहे. भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पंढरपुरात पुराचा धोका निर्माण झाला आहे. सध्या पंढरपुरात ७३ हजार क्युसेक इतक्या विसर्गाने चंद्रभागा प्रवाहित झाली आहे. दरम्यान चंद्रभागेतील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

सिना कोळेगाव प्रकल्पातुन 95 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग

धाराशिव : अहिल्यानगर, बीड, सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिना कोळेगाव प्रकल्पाचे सर्वच २१ दरवाजे उघडले आहेत. परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव प्रकल्पातुन ९५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शंभर वर्षात सर्वाधिक पाणी आल्याची माहिती पाट बंधारे विभागाकडून देण्यात अली आहे. दरम्यान पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सीना नदीकाठच्या गावांतील नागरीकांचे स्थलांतर तर प्रशासनाकडुन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - भांडुप रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची बत्ती गुल

Rutuja Bagwe: मुंबईत नाही तर या ठिकाणी घेतलं ऋतुजाने शिक्षण

Varicha Dosa Recipe : नवरात्रीत उपवासाला बनवा वरीचा डोसा, १० मिनिटांत रेसिपी तयार

Shahad Bridge: महत्वाची बातमी! शहाड पूल १५ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्गाचा करा वापर

Marathi Movie: 'लास्ट स्टॉप खांदा...' चित्रपटाचं कलरफुल पोस्टर लाँच; श्रमेश बेटकरसोबत दिसणार ही अभिनेत्री

SCROLL FOR NEXT