Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar News: शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून फसवणूक करणाऱ्यांचा लवकरच बंदोबस्त; आमदार शिंदेंवर शरद पवारांचा निशाणा

Pandharpur News : शरद पवार यांनी पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे अजित पवार गटाच्या आमदार शिंदे पिता- पुत्राला दम दिल्याने सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली

भारत नागने

पंढरपूर : भलत्याचा नावावर कर्ज काढले त्याचे पैसे तिसऱ्याने उचलले. त्याचा परिणाम अनेक शेतकरी कर्जमाफीपासून (Pandharpur) वंचित राहिले. हे काम कुणी केले असेल मला माहिती नाही. पण हे काम ज्यांनी कुणी केले असेल, तर सगळी माहिती एकत्र करून माझ्याकडे द्या. शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून फसवणूक करणाऱ्या नेत्यांचा लवकरच बंदोबस्त करू; असा थेट इशारा अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांना (sharad Pawar) शरद पवार यांनी दिला आहे. (Tajya Batmya)

शरद पवार यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यातील कापशी येथे आज शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यात शरद पवार यांनी अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला. शरद पवार यांनी पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे अजित पवार गटाच्या आमदार शिंदे पिता- पुत्राला दम दिल्याने सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांना नेते म्हणून घ्यायचा अधिकार नाही 
अलीकडे बबन शिंदे यांनी साखर कारखान्याच्या सभासदांच्या नावावर अर्ज काढल्याचा आरोप आहे. शेतकरी. मेळाव्यात राष्ट्रवादीचे संजय पाटील घाटणेकर यांनी शेतकर्यांच्या नावावर कर्ज काढल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बोलताना शरद पवार यांनी आमदार शिंदे यांना अप्रत्यक्ष दम दिला. (farmer) शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे काम जर नेते करत असतील तर त्यांना नेते म्हणून घ्यायचा अधिकार नाही. अशा कठोर शब्दात पवारांनी पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे आमदार बबनराव शिंदे आणि स्टेजवर उपस्थिती असलेल्या जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांना फटकारले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT