Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur : पंढरपुरात रेशन धान्याचा काळाबाजार; शिवसेना पदाधिकाऱ्यांची धाड, कारवाईस टाळाटाळ

Pandharpur News : पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी रेशन धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात कारवाई करण्यास टाळाटाळ

भारत नागणे

पंढरपूर : गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून मिळत असलेल्या रेशन धान्याचा काळाबाजार होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पंढरपुरात अशाच प्रकारे रेशन धान्याचा काळाबाजार होत असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धाड टाकत उघडकीस आणले आहे. यामुळे खळबळ उडाली असली तरी या प्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. 

रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून स्वस्तात धान्य उपलब्ध करून दिले जात असते. मात्र अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना कमी धान्य देऊन त्याची काळ्याबाजारात विक्री केली जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. प्रामुख्याने तांदळाचा काळाबाजार होत असताना कारवाई देखील झाली आहे. तरी देखील हे प्रकार थांबलेले नसून पंढरपूरमध्ये रेशन धान्याचा काळाबाजार होत असल्याचे उघडकीस आले आहे. 

खासगी जागेत धान्य वितरण 
सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात पूर स्थिती आहे. नागरिकांना धान्याची गरज असताना पंढरपूरमध्ये रेशन धान्याचा काळाबाजार सुरू असलेल्या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांची धाड टाकली आहे. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यांनी खाजगी जागेत धान्य वितरण सुरू असतानाचा प्रकार समोर आणला आहे. कराड रस्त्यावर सिंहगड कॉलेजजवळ सहा ट्रक मधील गहू आणि तांदूळ कोणत्याही सक्षम पुरवठा अधिकाऱ्याच्या उपस्थितीशिवाय वितरण सुरू असल्याचे समोर आले आहे. 

कारवाईस टाळाटाळ 
दरम्यान सोलापूर जिल्ह्यात पूर्वपरिस्थितीत मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने संसार उघड्यावर आला आहे. अशा पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी रेशन धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप देखील शिवसेनेने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT