Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Vitthal Mandir : तिरुपती, अयोध्यानुसार पंढरपुरात टोकन दर्शन सुविधा; कार्तिकीनिमित्ताने ४ नोव्हेंबरपासून चोवीसतास दर्शन

Pandharpur News : पंढरपूरला वर्षभर भाविकांची रीघ सुरु असते. मात्र आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी यात्रेनंतर येणाऱ्या प्रमुख पंढरपूर यात्रेतील कार्तिकी एकादशी यंदा १२ नोव्हेंबरला होणार आहे. त्या निमित्ताने ४ ते २० नोव्हेंबर या काळात श्री विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे; अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.  

पंढरपूरला (Pandharpur News) वर्षभर भाविकांची रीघ सुरु असते. मात्र आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. आषाढी व कार्तिकी एकादशीला महत्व देखील तितकेच आहे. त्यानुसार यंदाची कार्तिकी एकादशी १२ नोव्हेम्बरला आहे. या कार्तिकी यात्रेनिमित्ताने (Kartiki Ekadashi) येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता चोवीस तास दर्शन सुविधा सुरु करण्यात येत आहे. त्यानुसार ४ नोव्हेंबरपासून हि दर्शन सुविधा सुरु करण्यात येणार आहे. 

टोकन दर्शन सुविधा 
कार्तिक एकादशी काळात TCS कंपनी कडून प्रायोगिक तत्त्वावर टोकन दर्शन सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिरुपती, अयोध्या येथील दर्शन धर्तीवर पंढरपूर ही टोकन दर्शन सुविधा सुरू करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. या बरोबरच लवकरच पंढरपुरात अध्यात्मिक रेडिओ वाहिनी सुरू होणार असल्याचं औसेकर महाराज यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Hair Care: केस धुतल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरताय? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Momos chutney recipe: स्ट्रीट स्टाईल मोमोजची चटणी घरच्या घरी कशी बनवाल?

ODI World Cup : वनडे वर्ल्डकपसंबंधी ICC ने घेतला सर्वात मोठा निर्णय; स्पर्धेचं स्वरुपच बदलणार

पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

SCROLL FOR NEXT