Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Amol Kolhe News : अजित पवारांवर गावोगावी जाऊन प्रचार करण्याची वेळ; खासदार अमोल कोल्हे यांचा टोला

Pandharpur Assembly Election : विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेनिमित्ताने खासदार अमोल कोल्हे पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे

भारत नागणे

पंढरपूर : अजित पवार यांना जनतेचा मूड लक्षात आला आहे.  जनतेचा मुड महा विकास आघाडी सत्तेत आणायची असा असल्याने गावोगावी फिरत आहेत. त्यामुळेच अजित पवार याना बारामती मतदारसंघात देखील गावोगावी जाऊन प्रचार करण्याची वेळ आली; असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीत (Pandharpur News) पंढरपूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेनिमित्ताने खासदार अमोल कोल्हे पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी कोल्हे म्हणाले, कि चुकीला माफी होऊ शकते. मात्र गद्दारीला माफी होऊ शकत नाही. ३५ वर्ष राजकारणात असलेल्या अजित पवारांना भावनिक आवाहन करण्याची वेळ आली आहे. 

दल बदलूंना मतदार स्वीकारणार नाही 

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दोन पक्षाकडे उमेदवारी मागणारे हे काँग्रेसचे उमेदवार भालके आहेत. प्रत्येक वेळी पक्ष बदलणाऱ्या दल बदलूना पंढरपूर मंगळवेढामधील मतदार स्वीकारणार नाहीत; असा विश्र्वास खासदार कोल्हे यांनी व्यक्त केला.

सहा माजी नगरसेवकांनी काॅंग्रेस उमेदवाराची सोडली साथ

पंढरपुरातून एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पंढरपुरात काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. पंढरपूर शहरातील ६ माजी नगरसेवकांनी काॅंग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांची साथ सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत सहा माजी नगरसेवकांनी शरद पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांची ताकद वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकार नेहमी राजकीय खेळ करते - प्रियंका गांधी

आम्ही चर्चेसाठी तयार...; विरोधक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम, लोकसभेत मोठा गोंधळ|VIDEO

Breathing Problems : नाक बंद झालय? श्वास घ्यायला त्रास होतोय? तर घरच्या घरी करा 'हे' सोपे उपाय

Auto Tips : बाईक कमी मायलेज देतेय? 'हे' ५ बदल केल्याने होईल पेट्रोलची बचत

Blood Pressure : बीट की डाळिंब? BP नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता ज्यूस फायदेशीर

SCROLL FOR NEXT