Shahaji Bapu Patil On Sanjay Raut
Shahaji Bapu Patil On Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Shahaji Bapu Patil News: 'संजय राऊतांना चांद्रयानात बसवून पाठवलं असतं तर...' शहाजी बापू पाटलांची बोचरी टीका; ठाकरेंवरही साधला निशाणा

भारत नागने

पंढरपूर : सत्ता होती, आमदारांना डांबून ठेवता आले असते, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आम्हाला कुठ डांबायाला निघाले आहेत. तुम्ही स्वतःला डांबून घेतल्यानेच ही वेळ आली आहे; असा टोला सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू‌ पाटील (Shahaji Patil) यांनी लगावला आहे. (Breaking Marathi News)

आज आमदार शहाजी पाटील यांच्या महूद गावात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विषयी फटके बाजी केली.

राऊतांना चंद्रावर पाठवायला हवे होते..

मोदी साहेबांनी एक चूक केली. संजय राऊत यांना यानामध्ये बसवून चंद्रावर पाठवायला पाहिजे होतं. महाराष्ट्राची किड गेली असती. संजय राऊत यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये. त्यांची लय आबदा होईल असा सल्ला ही आमदार पाटील‌ यांनी दिला. उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांविषयी मोठं व्यक्तव्य केलं आहे. माझ्या हातात सत्ता होती. आमदारांना डांबून ठेवता आलं असतं, पण माझ्या नितिमत्तेत बसत नाही; असं विधान केलं होतं. त्यावर आमदार शहाजी बापू‌ पाटील यांनी उध्दव ठाकरे यांच्याविषयी टिप्पणी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांचं पालटणार नशीब, आर्थिक स्थिती होणार मजबूत, तुमची रास?

Horoscope 18 May : मेष ते मीन राशीसाठी शनिवार काय घेऊन आलाय?

TVS Apache चा नवीन Black Dark Edition भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Bachchu Kadu: निवडणूक मुद्द्यांवर झाली पाहिजे, धर्म आणि जातीवर होता कामा नये: बच्चू कडू

Arjun Tendulkar- Nicholas Pooran: पूरनचे लागोपाठ २ षटकार अन् अर्जुन तेंडुकरने मैदानच सोडलं! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT