Solapur News Milk Price
Solapur News Milk Price Saam tv
महाराष्ट्र

Solapur News: सोलापूर जिल्ह्यात दूध दराचा प्रश्न पेटला; पालकमंत्रीना जिल्ह्यात फिरू न देण्याचा रयत क्रांती संघटनेचा इशारा

भारत नागणे

पंढरपुर : सोलापूर जिल्ह्यात दूध दराच्या प्रश्वारून शेतकरी (Farmer) आक्रमक झाले आहेत. असे असतानाच आता रयत क्रांती संघटनेने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना थेट इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

आगामी काळात सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील दूध दाराचा प्रश्न‌ पेटण्याची शक्यता आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील खासगी दूध संघानी प्रती लिटर पाच ते सहा रूपये दर कमी केले आहेत. दूध दर कमी केल्याने दूध उत्पादक शेतकरी व विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

दररोज 50 लाखाचा फटका

मागील तीन ते चार दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात दूध दरावरून आंदोलन सूरू आहे‌. यामध्ये आता रयत क्रांती संघटनेने उडी घेतली आहे. खासगी दूध संघाकडून शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. दररोज किमान 50 लाख रूपयांचा फटाका दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

विखे पाटलांना इशारा

गाईच्या दूधाला किमान प्रती लिटर 40 रूपये व म्हशीच्या दूधाला 70 रूपये भाव द्यावा. यासाठी पालकमंत्री तथा पशू व दूग्ध मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा. अन्यथा येत्या 25 मे नंतर दूग्ध मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार. शिवाय एक दूधाचा टॅंकर बाहेर पडू दिला जाणार नाही; असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी आज येथे दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime : सोशल मिडियावर ओळख; लग्नाचे आमिष देत विवाहितेवर अत्याचार

Today's Marathi News Live : अजिंठा घाटात बस पलटी, सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

Priyanka Gandhi: राहुल गांधी पुन्हा 2 जागांवर निवडणुकीच्या रिंगणात, प्रियंका गांधींसाठी काँग्रेसचा प्लॅन काय? बड्या नेत्याने दिली माहिती

Amruta Kulkarni: अमृताचे गाजलेले चित्रपट माहितीये आहेत का?

Jalgaon News : शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

SCROLL FOR NEXT