Petrol Diesel News: आता ५०-१०० रुपयांचे पेट्रोल मिळणार नाही?; पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सांगितले मोठे कारण

Petrol Diesel News: फक्त ५० ते १०० रुपयांचे पेट्रोल हवे असेल तर २००० ची नोट स्विकारली जाणार नाहीये.
Petrol Diesel News
Petrol Diesel NewsSaam TV

RBI Decision on Rs 2000 Note: आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बँकेत बदलून घेण्यास सांगितलं आहे. त्यामुळे सर्वच व्यक्ती आपल्या जवळ असलेल्या नोटा खर्च करत आहेत. अशात नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनने एक मोठा निर्णय घेतलाय. यामध्ये तुम्हाला फक्त ५० ते १०० रुपयांचे पेट्रोल हवे असेल तर २००० ची नोट स्विकारली जाणार नाहीये. (Latest Petrol Diesel News)

पेट्रोल पंपावर केवळ ५० आणि १०० रुपयांच्या पेट्रोल खरेदीला २ हजारांची नोट बंद करण्यात आली आहे. नाशिक (Nashik) जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतलाय. २ हजारांची नोट २ हजार रुपयांची खरेदी अथवा त्या तुलनेतील खरेदीसाठीच स्वीकारली जाणार आहे.

Petrol Diesel News
Sanjay Raut: संजय राऊतांना दिलासा! नाशिक सत्र न्यायलयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

२ हजार रुपयांची नोट चलनातून बंद करण्याच्या आरबीआयच्या निर्णयानंतर पेट्रोल (Petrol) पंपावर खरेदीसाठी २ हजार रुपयांच्या नोटांचा वापर वाढल्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे म्हणणे आहे.

सर्व सन्माननिय ग्राहकांना सूचित करण्यात येते की, भारत सरकार/आरबीआयच्या निर्देशानुसार ३०/०९/२०२३ पर्यंत २०००/- रु. चलनी नोट केवळ २००० /- रु. ची खरेदी अथवा त्या तुलनेच्या खरेदीपोटी किंवा सुट्ट्या पैशांच्या उपलब्धतेनुसार स्वीकारल्या जातील. पेट्रोल पंपावर केवळ ५० / १०० रुपयांच्या खरेदीच्या बदल्यात २०००/- रुपयांची नोट स्विकारली जाणार नाही. कृपया सहकार्य करा, अशा आशयाचे पोस्टर येथे लावण्यात आलं आहे.

Petrol Diesel News
Jayant Patil ED Notice: जयंत पाटील आज ईडी कार्यालयात होणार हजर; कार्यकर्त्यांकडून आंदोलनाला सुरुवात

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com