Pandharpur Maghi Yatra Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Maghi Yatra : माघी यात्रेनिमित्त रात्री बारापर्यंत दर्शन व्यवस्था; भाविकांसाठी पाच लाख लाडू प्रसाद तयार

Pandharpur News : माघी यात्रेसाठी विठ्ठल मंदिर समितीने सुमारे पाच लाख बुंदी लाडू तयार केले आहेत. लाडू प्रसादामध्ये काजू, बदाम, बेदाणा, वेलची आदी सुक्याचा मेव्याचा ही वापर केला आहे

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपुरात आठ फेब्रुवारीला माघी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे. तर यात्रेनिमित्ताने पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद म्हणून सुक्या मेव्याचा लाडू देण्यात येणार आहे. यासाठी सुमारे पाच लाख लाडू प्रसाद तयार करण्यात आलेला आहे. 

पंढरपूरमध्ये वर्षभरात होणाऱ्या प्रमुख यात्रेपैकी एक असलेली माघी यात्रा ८ फेब्रुवारीला होत आहे. यामुळे भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. आलेल्या भाविकांसाठी गोपाळपूर रोडवरील मोकळ्या जागेमध्ये आठ पत्रा शेड उभारले आहेत. या ठिकाणी भाविकांना मंदिर समितीच्या वतीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाय स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. 

पाच लाख बुंदीचे लाडू तयार 

माघी यात्रेसाठी विठ्ठल मंदिर समितीने सुमारे पाच लाख बुंदी लाडू तयार केले आहेत. लाडू प्रसादामध्ये काजू, बदाम, बेदाणा, वेलची आदी सुक्याचा मेव्याचा ही वापर केला आहे. पौष्टीक आणि शुध्द लाडू प्रसाद तयार केल्याने भाविकांमधून प्रसादाला मागणी वाढली आहे. यात्रेसाठी चार ते पाच लाख भाविक येथील असा अंदाज आहे. यात्रेच्या निमित्ताने सुमारे पाच लाख बुंदी लाडू तयार केले आहेत. लाडू प्रसाद तयार करण्याचे काम सुरू असून ८१ कामगार काम करत आहेत. मंदिर परिसरात चार लाडू प्रसाद विक्री केंद्रे सुरू करण्यात आले आहेत. विक्री केंद्रातून सातशे ग्रॅम वजानाचे दोन लाडू प्रसाद २० रूपयांमध्ये भाविकांना दिलो जातो. 

रात्री १२ वाजेपर्यंत दर्शन व्यवस्था 

माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी किमान चार ते पाच लाख भाविक येथील असा अंदाज आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर समितीने सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत विठ्ठल रुक्मिणी दर्शन व्यवस्था सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. यात्रा काळात मंदिर समितीने जवळपास १८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

स्नानासाठी सोडले चंद्रभागेत पाणी

माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी बंधाऱ्यातून चंद्रभागेच्या नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. चंद्रभागेतील पाणी प्रदूषित झाले असून पाण्यामध्ये आळ्या आणि किडे तयार झाले आहेत. दूषीत पाण्यामुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात साम टीव्ही बातमी प्रसिद्ध केली होती. बातमीची दखल घेऊन शासनाने माघ यात्रेच्या निमित्ताने चंद्रभागा नदी पात्रात पाणी सोडले आहे. नदीपात्रात पाणी सोडल्याने माघ वारीसाठी येणाऱ्या भाविकांची चंद्रभागा स्नानाची सोय झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Maharashtra News Live Update: मनसेच्या नेत्यांची आज राज ठाकरेंनी बोलवली बैठक

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 1 ऑक्टोबरपासून पगारात होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT