Sangola News Saam tv
महाराष्ट्र

Sangola News : तीन महिन्यांपासून रेशनच्या धान्यापासून वंचित; सांगोल्यातील करांडवाडीतील ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ

Pandharpur sangola : सरकारकडून गोरगरिब असलेल्या रेशन कार्ड धारकांना स्वस्तात धान्य दिला जात असतो. दर महिन्याला याचे वाटप करण्यात येत असते. मात्र काही ठिकाणी गरिबांना हक्काचे धान्य मिळत नसल्याचे दिसून येते

Rajesh Sonwane

पंढरपूर : सरकारकडून गरिबांना स्वस्तात दर महिन्याला धान्य वाटप केले जात असते. मात्र सांगोला तालुक्यातील करांडवाडीतील ग्रामस्थ मागील तीन महिन्यांपासून रेशनच्या धान्यापासून वंचित आहेत. रेशनचे धान्य मिळत नसल्याने येथील गोरगरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे आठ दिवसात रेशन दुकानातून धान्य मिळावे अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

सरकारकडून गोरगरिब असलेल्या रेशन कार्ड धारकांना स्वस्तात धान्य दिला जात असतो. स्वस्त धान्य दुकानातून दर महिन्याला याचे वाटप करण्यात येत असते. मात्र काही ठिकाणी गरिबांना हक्काचे धान्य मिळत नसल्याचे दिसून येते. अशाच प्रकारे सांगोला तालुक्यातील करंडवाडी येथील लाभार्थ्यांना मागील तीन महिन्यांपासून धान्य वाटप करण्यात आलेले नाही. परिणामी तीन महिन्यांपूर्वी मिळालेले धान्य आता संपण्यावर आले आहे. 

सर्व लाभार्थी मोलमजुरी करणारे 

सांगोल्यापासून ४० किलोमीटर अंतर दूर असलेल्या करांडवाडी या दुष्काळी गावात ८४ लाभार्थी कुटुंब आहेत. ही सर्व कुटुंब मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात. शासनाकडून मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा या कुटुंबांना मोठा आधार आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून येथील रेशन दुकानातून येथील लाभार्थी कुटुंबांना धान्य मिळाले नाही. त्यामुळे येथील कुटुंबावर उपासमारीची वेळ आहे. 

तर आंदोलनाचा दिला इशारा 

दरम्यान सांगोला येथील पुरवठा अधिकाऱ्याकडे याबाबतर वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. तरी देखील याची दखल घेतली जात नाही. अखेर आज येथील ग्रामस्थांनी पुरवठा कार्यालायत येऊन आपले कैफियत मांडली. यावेळी लाभार्थ्यांनी आठ दिवसात रेशनचे धान्य मिळावे अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा आता येथील ग्रामस्थांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोमेश्वर साखर कारखान्याच्या विजयी उमेदवारांचे अजितदादांना अभिवादन; जय पवारांची उपस्थिती

उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT