Parbhani Crime
Parbhani CrimeSaam tv

Parbhani Crime : स्वस्तातील सोन्याचा मोह पडला महागात; घर बांधकामात सोने सापडल्याचे सांगत १० लाख रुपयात गंडा

Parbhani News : परभणीच्या दैठणा पोलीस स्टेशन हद्दीतील काही आरोपीत इसमांनी नांदेड जिल्हयातील लोकांना घराचे बांधकाम करताना सोने सापडले असुन ते आपणास स्वस्तात विक्री करायचे असे सांगितले
Published on

परभणी : नांदेड जिल्ह्यातील लोकांना घराचे बांधकाम करताना सोने सापडले असून ते स्वस्तात विकत देऊ; असे सांगत १० लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. या टोळीला परभणी स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून चार आरोपींना दहा तासाच्या आत जेलबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तर या आरोपीकडून पाच लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. 

Parbhani Crime
Vitthal Rukmini Puja : विठ्ठल रुक्मिणी पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी; २५ मार्चपासून अशी करा नोंदणी

परभणीच्या दैठणा पोलीस स्टेशन हद्दीतील काही आरोपीत इसमांनी नांदेड जिल्हयातील लोकांना घराचे बांधकाम करताना सोने सापडले असुन ते आपणास स्वस्तात विक्री करायचे असे सांगितले. याकरिता १७ मार्चला नांदेड येथील लोकांना बाभळगाव शिवारात बोलावुन घेतले व त्यांना त्यांच्याकडील सोन्याचे क्वाईन दाखवुन विश्वास प्राप्त केला. यावर विश्वास ठेवत फिर्यादीने १० लाख रूपये संबंधितास दिले. 

Parbhani Crime
Ambarnath Corporation : अंबरनाथमध्ये करवसूलीसाठी जप्तीची मोहीम; १२ कमर्शिल मालमत्तांना ठोकलं सील
Parbhani Crime
Vitthal Rukmini Puja : विठ्ठल रुक्मिणी पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी; २५ मार्चपासून अशी करा नोंदणी

सोने काढून आणत असल्याचे सांगत झाले फरार 

१० लाख रुपयांची रक्कम घेतल्यानंतर पुरून ठेवलेले सोने काढुन आणुन देतो; असे सांगुन पोबारा केला. सदर इसम परत न आल्याने फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीसांना फोनवरून घडल्या प्रकाराची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या सूचनेसह पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील हे पथकासह घटनास्थळावर रवाना झाले. 

Parbhani Crime
Ambarnath Corporation : अंबरनाथमध्ये करवसूलीसाठी जप्तीची मोहीम; १२ कमर्शिल मालमत्तांना ठोकलं सील

गावात सापळा रचत घेतले ताब्यात 
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माहिती घेत आरोपींचा शोध सुरु केला. यानंतर गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून उमरी गावात सापळा रचुन चौघांना ताब्यात घेतले. यात्रा केशव धोंडीराम राठोड (वय ४७, रा. रामनगर तांडा, जि. बीड), उथलराज गर्जेन्द्र भोसले (वय २३, रा. पोहंडुळ, जि. परभणी), अशोक दशरथ पवार (वय ५०, रा. उमरी ता. जि. परभणी) व इतर एक यांना यांचा समावेश आहे. चौकशी केली असता गुन्ह्यातील अडीच लाख रूपये मिळुन आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com