Jayant Patil Saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Pandharpur News : पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांची‌ पंढरपुरात जाहीर सभा झाली

भारत नागणे

पंढरपूर : राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा होत आहे. यातच शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा भाजपाचा निर्धार केला आहे. अमित शहा यांनी तसे वेळोवेळी बोलून देखील दाखवले आहे; असा मोठा दावा आज पंढरपुरात केला.


पंढरपुरातील (Pandharpur) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांची‌ पंढरपुरात जाहीर सभा झाली. या सभेपूर्वी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कोण होणार यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार असल्याचे बोलून दाखविले. 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे आज जाहीर केले आहे. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी हा मोठा दावा केला आहे. राज्यात भाजप- शिवसेना महायुतीचे सरकार निवडून आल्यानंतर भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा इराधा केला आहे. निवडणूकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कधी सुट्टी देतील हे सांगता येणार नाही; असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक लुटण्याचा प्रयत्न

Ration Card: कामाची बातमी! ७० लाख रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता; १ एप्रिलपासून नियम बदलणार

भाजप आमदाराच्या मुलाचा टोल नाक्यावर राडा, पैसे मागितले म्हणून कर्मचाऱ्याला मारले, घटना CCTV मध्ये कैद

Rashmika-Vijay Wedding : लगीन घटिका समीप आली! रश्मिका-विजय आज अडकणार लग्नबंधनात; पाहा शाही लग्नाचा मुहूर्त कधीचा?

Maharashtra Politics: विरारमध्ये भाजपला खिंडार, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; शेकडो कार्यकर्त्यांसह बविआमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT