Girish Mahajan Uddhav Thackray Saam tv
महाराष्ट्र

Girish Mahajan : ठाकरे ब्रँड त्याच दिवशी संपला; मंत्री गिरीश महाजन यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Pandharpur News : ठाकरे गट शिवसेना पक्षाबाबत मत व्यक्त करत उबाठातील सात ते आठ खासदार भाजपसोबत असल्याचा खळबळजनक दावा गिरीश महाजन यांनी केला. कोकाटे यांच्या व्हायरल व्हिडिओ बद्दल देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली

भारत नागणे

पंढरपूर : भाजपला सोडून शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली तेव्हाही ठाकरे ब्रँड संपला. मात्र हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेले; त्याच दिवशी ठाकरे ब्रँड संपला. अशा शब्दात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. तसेच उबाठातील सात ते आठ खासदार मनाने भाजपसोबत असल्याचा दावाही गिरीश महाजन यांनी केला.

पंढरपुरात मंत्री गिरीश महाजन हे आज विठ्ठल- रुख्मिणी दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच विधिमंडळामध्ये बसून रमी खेळण्याचे कोणी समर्थन करणार नाही. हे आयोग्यच आहे. असेही मंत्री महाजन यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हायरल व्हिडिओ बद्दल प्रतिक्रिया देताना महाजन यांनी सांगितले. 

राऊतही भाजपच्या वरच्या गोटातले झाले असावेत 

राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत, असे संजय राऊत म्हणतात. कदाचित संजय राऊत सध्या भाजपच्या वरच्या गोटातले झाले असावेत. ज्या फेरबदलाची कल्पना मुख्यमंत्र्यांना माहिती नाही. ते कदाचित संजय राऊत यांना पक्षश्रेष्ठीकडून दिल्लीतून कळले असावे. असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे.

दोन शिवसेना एकत्र येतील अशी आशा अंबादास दानवे यांनी व्यक्त केली असेल यावर शंभूराज देसाई यांनी असं कोणीही आशा व्यक्त करू शकतो. आता उबाठा आणि मनसे एकत्र येणार; अशी आशा धरून काहीजण बसले आहेत. मात्र मनसे म्हणत आहे, आम्ही मराठीचा मुद्द्यावरून एकत्र आलो आहे. आमच्या पक्षात राष्ट्रीय राज्य कार्यकारणी झाली यामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी कोणतीही चर्चा नाही; असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime : महापालिकेच्या नावाने सायबर फसवणूक! फक्त १० रुपये भरताच बँक खात्यातून उडाले लाखो रुपये

Manoj Jarange : जरागेंच्या हत्येचा कट, धनंजय मुंडेंच्या कट्टर समर्थकाला बेड्या, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

Maharashtra Live News Update: धुळ्यात 8.0°c तापमानाची नोंद

8th Pay Commission: ६९ लाख पेन्शनधारकांना झटका! मिळणार नाही आठव्या वेतन आयोगाचा लाभ? वाचा सविस्तर

Gajar Halwa Recipe : ना साखर, ना खवा; 10 मिनिटांत बनवा गाजर हलवा, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT