Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Ranjitsinh Naik Nimbalkar : शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नेरिटीव सेट केला; माजी भाजप खासदाराचा आरोप

Pandharpur News : रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आज पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाज आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला

भारत नागणे

पंढरपूर : लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी जातीयवादाचे विष पेरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नेरिटीव सेट करण्याचे काम केल्याचा आरोप माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर (Pandharpur)) हे आज पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाज आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार (sharad Pawar) आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. तसेच लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवारांनी जातीयवादाचे विष पेरून कुटिल राजकारण केले. इंग्रज गेले असले, तरी शरद पवार त्यांचे जोडे घालून आज फिरतात. कुटनितीचे राजकारण करत आहेत. तोडा फोडा आणि जोडा ही निती वापरून त्यांनी समाजासमाजामध्ये जातीयतेचे विष पेरण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

मोक्का लागलेल्यांसोबत रामराजे नाईक निंबाळकर बसतात  
फलटण शहरातील सर्व खुनी रामराजे यांच्या सोबत फिरतात. दहशतवादी, मोक्का कारवाई झालेले आरोपी, हफ्ते घेणारे सर्वजण त्यांच्यासोबत बसत असतात. शहरात दरोडा पडला आणि त्यातील वाटणी घेण्यास देखील ते मागेपुढे पाहत नाहीत; अशी जहरी टिका रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DIG च्या मुलीनं आयुष्याचा दोर कापला, AIIMS नागपूरमध्ये घेत होती शिक्षण

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल अपघातात ८ जणांचा मृत्यू

Shreya Ghoshal Concert: श्रेया घोषालच्या कॉन्सर्टवेळी चेंगराचेंगरी; स्टेजजवळ हाणामारी, दोघे बेशुद्ध; पाहा VIDEO

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकला, जालना हादरलं

SCROLL FOR NEXT