Chandrabhaga River Flood Saam tv
महाराष्ट्र

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

Pandharpur News : दोन- तीन दिवसांपासून उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. आज देखील मुसळधार पाऊस पडत असल्याने भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. चंद्रभागा देखील दुथडी भरून वाहत आहे

भारत नागणे

पंढरपूर : भीमा आणि निरा खोर्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी भीमा नदीला पूर आला आहे. पंढरपुरात देखील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. दरम्यान पंढरपूर शहरातील आंबाबाई आणि संतपेठ परिसरात राहणारे शंभर कुटुंब बाधित झाली असून सुमारे ४०० हून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात येणार आहे. याची तयारी प्रशासनाकडून सुरु करण्यात आली आहे. 

राज्यात जोरदार पाऊस सुरु असून आज देखील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. यात भीमा व नीरा खोऱ्यात आज देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी भीमा व चंद्रभागा नदीला पूर आल्याने पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे पंढरपुरातील अनेक घरे पाण्याखाली गेले असून नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासन याकडे लक्ष ठेवून आहे. 

दरम्यान पंढरपूरमधील आंबाबाई आणि संतपेठ परिसरात पुराचे पाणी येऊ लागले आहे. यामुळे या परिसरातील सुमारे १०० कुटुंब बाधित झाले आहेत. या बाधित लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार नगरपालिकेच्या वतीने बाधित कुटुंबांना राहण्याची सोय तर मंदिर समितीच्या वतीने जेवण्याची सोय करण्यात आली आहे.

नदीत पाण्याचा प्रवाह वाढताच 

सध्या उजनी धरणातून ९० हजार तर वीर धरणातून ५४ हजार असा एकूण १ लाख ४४ हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत येत आहे. तसेच चंद्रभागा नदीला देखील पूर आला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून नदीकाठच्या भागातील सुमारे ४०० हून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यामुळे आज दिवसभरातील पाण्याचा प्रवाह लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन विभाग देखील सतर्क झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Recruitment: आनंदाची बातमी! १५,६३१ पदांच्या पोलिस भरतीचा शासन निर्णय जारी, परीक्षा शुल्क किती?

Airtel Data Plan: एअरटेलचा ग्राहकांना झटका, सर्वात स्वस्त डेटा प्लान केला बंद

मोठी बातमी! गणेशोत्सव काळात मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

BEED: मॅरेथॉनसाठी हायवेवर धावण्याची प्रॅक्टिस, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; शिक्षकांची अजब उत्तरं; VIDEO व्हायरल

Video : लोकसभेत गदारोळात मला मारहाण केली, जोरात ढकललं; महिला खासदाराचे केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT