Rain Grant Scam
Rain Grant ScamSaam tv

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Jalna News : जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणी साम टीव्हीचा पाठपुरावा सुरु असून त्याला यश मिळाले असून अखेर दोषी असलेल्या २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला
Published on

अक्षय शिंदे 

जालना : जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या बदल्यात शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात आलेल्या अतिवृष्टी अनुदान रक्कमेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. राज्यभरात गाजलेल्या या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी अखेर २८ कर्मचाऱ्यांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 

जालना जिल्ह्यात उघडकीस आलेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याबाबत एप्रिलमध्ये सर्वप्रथम साम टीव्हीने अतिवृष्टी बातमी प्रसारित केली होती. या प्रकरणी पाठपुरावा केल्यानंतर अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी अखेर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जालन्यातील अंबड पोलीस ठाण्यामध्ये २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांनी साधारण २५ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

Rain Grant Scam
Fake Marriage : नाव बदलून केला विवाह; कुटुंबाकडून लग्नासाठी घेतले १ लाख ७० हजार रुपये, टोळीतील तिघे ताब्यात

सदरच्या घोटाळ्यामध्ये महसूल अधिकारी, कर्मचारी, संगणक ऑपरेटर आणि नेटवर्क इंजिनिअर यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. या कर्मचाऱ्यांनी शासकीय निधी स्वतःच्या फायद्यासाठी बनावट दस्तऐवजाद्वारे हडप केला असून संगणक प्रणालीत देखील फेरफार केली आहे. तसेच कागदोपत्री व संगणकीय अभिलेख नष्ट करून पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याने या २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rain Grant Scam
Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

एकूण ७६ कर्मचारी आहेत दोषी 

जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी ७६ अधिकारी कर्मचारी दोषी असल्याचे समोर आलं होतं. मात्र या प्रकरणी काल मध्यरात्री केवळ २८ महसूलच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उर्वरित अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कधी गुन्हे दाखल होणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com