Dhairyasheel Mohite Patil Saam tv
महाराष्ट्र

Dhairyasheel Mohite Patil : आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर भाषेत उत्तर; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया

Pandharpur News : कुर्डू गावात माजी सरपंच धाणे यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला होता यावर बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया देत निशाणा साधला आहे

भारत नागणे

पंढरपूर : कुर्डू गावच्या अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात गुन्हे दाखल होऊन आरोपींना अटक होत नाहीत. आरोपी खुलेआम माध्यमांसमोर येत आहेत. आपल्यावर कुणीही आरोप केले असतील तर अशा सर्वांना आपण कायदेशीर भाषेत उत्तर देणार आहे; अशी प्रतिक्रिया माढा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच आरोपींना अटक होत नाही असे विधान करून मोहिते पाटील यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभा केले.

माढा तालुक्यातील कुर्डू गावात माजी सरपंच अण्णा धाणे यांनी सोलापूर जिल्ह्याचे वाल्मीक कराड म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील आहेत. असा आरोप केला होत. मात्र यावर खासदार मोहिते पाटील यांनी कुर्डू प्रकरणात आरोपींना अटक होत नाही. फडणवीस साहेब शिवरायाचे भक्त आहेत. मग त्यांच्या राज्यात गुन्हेगारांना अटक का होत नाही ? असा सवाल करत सोलापूर जिल्ह्यातील पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

अजितदादांना फोन लावून देणारा मध्यस्थी कोण?
तसेच आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचा अजितदादांचा फोन झाला. मात्र अजितदादा यांना नक्की कुणी फोन लावला होता. तो मध्यस्थी कोण आहे. याबाबत अजितदादा यांना विचारा. अजितदादा याच्याशी फोनवर बोललेला मध्यस्थी कोण होता. याबाबत खुलासा करतील; असेही यावेळी मोहिते पाटील यांनी सांगितले आहे.

वन खाते गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असताना पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. आयपीएस अधिकाऱ्यांवर हल्ला होतो हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही. उलट उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकाऱ्यांची बाजू घेण्यापेक्षा त्यांच्यावर दबाव आणतात. म्हणजे माफियांना मदत करण्याची पार्श्वभूमी दिसून येते. हळूहळू सर्व प्रकरण बाहेर काढेल, तेही पुराव्यासह बाहेर काढेल; असे मोहिते पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात धुव्वाधार पावसाची हजेरी

Hingoli Heavy Rain : हिंगोलीत तुफान पाऊस; रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक बंद, बाजार समितीतही नुकसान

Kolhapur Madhuri Elephant : माधुरी हत्तीण पुन्हा कोल्हापुरात येणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Saturday Horoscope : आज कोणत्या राशीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या शनिवारचे राशीभविष्य

Pitru Paksha 2025: पितृपक्ष काळात स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे मानले जाते शुभ, जाणून घ्या त्यांचे महत्त्व

SCROLL FOR NEXT