Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur : विठ्ठल दर्शनाची आस राहिली अपूर्ण; चंद्रभागेत स्नान करायला गेलेल्या भाविकाचा मृत्यू

Pandharpur News : कर्नाटकातील बेगळगाव जिल्ह्यातून काही तरुण भाविक विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शन घेण्यापूर्वी हे सर्व तरुण आज सकाळी येथील चंद्रभागा स्नानासाठी नदी पात्रात गेले होते

भारत नागणे

पंढरपूर : काही दिवसांवर आषाढी यात्रा असल्याने भाविक विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात येत आहेत. अशाच प्रकारे बेळगाव (कर्नाटक) येथील काही तरुण भाविकांचा ग्रुप विठ्ठल दर्शनाची आस घेऊन पंढरपुरात दाखल झाले. मात्र दर्शन होण्यापूर्वीच दुर्दैवी घटना घडली. यात भाविकाचा दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी गेला असताना बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली आहे. 

कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील शुभम ज्ञानेश्वर पावले (वय २७) असे घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कर्नाटकातील बेगळगाव जिल्ह्यातून काही तरुण भाविक विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शन घेण्यापूर्वी हे सर्व तरुण आज सकाळी येथील चंद्रभागा नदी पात्रात स्नानासाठी गेले होते. यामध्ये शुभम पावले हा देखील चंद्रभागा स्नान करण्यासाठी गेला होता. 

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला 

सर्व तरुण चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी गेले. यावेळी शुभम हा पाण्यात उतरला असता नदी पात्रातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ही घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास येथील भक्त पुंडलिक मंदिराजवळ घडली. तरुण बुडाल्याची माहिती मिळताच बचाव पथक तसेच स्थानिक नागरिकांनी बुडालेल्या तरुणाचा शोध घेत त्याचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी तपास सुरु आहे.  

भाविकांची होऊ लागली गर्दी 

आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली असल्याने विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी भाविक आता पंढपुरात दाखल होऊ लागले आहेत. आषाढी यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेता त्यापूर्वी दर्शन घेण्याच्या इराद्याने दूरवरून भाविक येत आहेत. यामुळे आतापासून दर्शन रांगा लागू लागल्या आहेत. तसेच चंद्रभागा नदीत देखील स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी होताना दिसून येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saiyaara : अनीत पड्डा -अहान पांडेचा रोमँटिक ड्रामा कधी येणार ओटीटीवर? वाचा अपडेट

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये छावा संघटनेचं आंदोलन

हनी ट्रॅपमध्ये ४ मंत्री, मुख्यमंत्र्यांना सगळी माहिती; भाजप महिला नेत्यावरही निशाणा, खासदारानं उघडले सगळे पत्ते | Honey Trap

Mahadev Munde Case : महादेव मुंडेंच्या मानेवरचा मिसिंग तुकडा 'तो' पिशवीत घेऊन फिरतोय; विजय बांगर यांचा धक्कादायक खुलासा

Akola : मुदतबाह्य कीटकनाशकांची पुन्हा नवी पॅकिंग; अकोल्यात समोर आला धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT