Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: कार्तिकीच्या महापूजेला फडणवीस की पवार; पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीपुढे पेच

Pandharpur News : कार्तिकीच्या महापूजेला फडणवीस की पवार; पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीपुढे पेच

भारत नागने

पंढरपूर : कार्तिक एकादशीच्या विठ्ठल रूक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला असतो. त्यानुसार पुढील महिन्यात येणाऱ्या (Kartiki Ekadashi) कार्तिकी एकादशीला देवेंद्र फडणवीस कि अजित पवार या दोघांपैकी कोणाला निमंत्रण द्यायचे याचा पेच पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिर (Pandharpur) समितीपुढे निर्माण झाला आहे. असा पेच मंदिर समिती आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. (Breaking Marathi News)

आषाढी एकादशीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा केली जाते तर कार्तिकीची महापूजा केली जाते. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याची प्रथा युती शासनाच्या काळात 1995 पासून सुरू करण्यात आली. पहिली कार्तिकीची महापूजा तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते झाली होती. आतापर्यंत आर. आर. पाटील, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कार्तिकीची महापूजा करण्याचा मान मिळाला आहे.

येत्या २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीची विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा होईल. ही महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत असते. सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन उपमुख्यमंत्री असल्याने महापूजेला कोणाला निमंत्रण द्यायचे असा पेच निर्माण झाला आहे. दीड वर्षापूर्वी राज्यात सत्तांतर झाले. गेल्या आषाढीला पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला होता. तर कार्तिकीची महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला होता.

समितीकडून शासनाशी पत्रव्यवहार 

अजित पवारांनी नुकताच भाजप शिवसेनाला पाठिंबा देत सत्तेत उपमुख्यमंत्री पद घेतले आहे. सध्या राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यामुळे यंदाच्या कार्तिकीच्या महापूजेला कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायचे; असा नवा पेच समितीपुढे निर्माण झाला आहे. दरम्यान या संदर्भातील मंदिर समितीने राज्य शासनाकडे कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करावी; यासाठी पत्र व्यवहार केला आहे. शासनाच्या आदेशानंतर महापूजेचे निमंत्रण देण्यात येईल अशी माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

SCROLL FOR NEXT