अजय सोनवणे
मनमाड (नाशिक) : शेतकऱ्याने कांदा काढून चाळीत भरून ठेवला होता. चांगला भाव मिळेल त्यावेळी (Onion) कांदा विक्रीला काढायचा यादृष्टीने साठवणूक केली होती. परंतु कांदा ठेवलेल्या चाळीत अज्ञात व्यक्तीने (Farmer) युरिया टाकल्याने तब्बल ५० क्विंटल कांदा सोडून गेला आहे. (Tajya Batmya)
नाशिकच्या नांदगाव येथे हा प्रकार घडला आहे. शेतकरी मधुकर बागुल यांच्या नाग्या- साक्या धरणा शेजारील शेतात ४ एकर कांदे लागवड केली होती. कांद्याला भाव नसल्याने त्यांनी दीडशे क्विंटल कांदे हे चाळीत साठवून ठेवलेले होते. मात्र शेतातील घरी कोणी नसल्याचे बघून अज्ञाताने या कांदा चाळीत युरिया टाकल्याने कांद्याला उग्र वास येवून तो सडू लागल्याचे शेतकरी बागुल यांनी सांगितले.
शेतकऱ्याचे नुकसान
चाळ फोडून बघितली असता त्यातील ४० ते ५० क्विंटल कांदे हे सडलेले निघाले. कांद्याचा लिलाव बंद असल्याने शिल्लक कांदा विकता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला. दरम्यान गेली तीन दिवस शासकीय सुट्टी असल्याने या घटनेचा पंचनामा करायला कोणीही अधिकारी व कर्मचारी फिरकला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.