Pandharpur Vitthal Mandir Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाचे पदस्पर्श दर्शन लांबणीवर; विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन- संवर्धनाचे काम रखडले

Pandharpur News : पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. यामुळे १५ मार्चपासून विठुरायाचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलं आहे.

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम या महिन्यात पूर्ण होणार (Pandharpur) अशी अपेक्षा होती. मात्र सदरचे काम रखडल्याने विठुरायाचे पदस्पर्श दर्शन लांबणीवर पडले आहे. यामुळे भाविकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धार आणि संवर्धनाचे काम वेगाने सुरू आहे. (Vitthal Mandir) विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराला पुरातन मूळ रूप देण्यासाठी राज्य सरकारने ७४ कोटी रुपयांचा मंदिर विकास आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार हे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली (vitthal Rukmini Mandir) करण्यात येत आहे. यामुळे १५ मार्चपासून विठुरायाचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलं आहे. 

दिलेली मुदतही संपली 

मंदिर समितीने १ मे पर्यंत काम पूर्ण करून पदस्पर्श दर्शन सुरू करण्याची तयारी केली होती. पण ठेकेदाराला दिलेली ४५ दिवसांची मुदत संपून गेली आहे. तरी काम अद्याप संथ गतीने सुरू आहे. यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. चरणस्पर्श दर्शन बंद असल्याने या काळात देवाचे पहाटे सहा ते सकाळी ११ वाजेपर्यंत मुख दर्शन सुरू आहे. त्यामुळे देवाचे पदस्पर्श दर्शन कधी सुरू होणार याकडेच भाविकांचे लक्ष लागले आहे. वेळेत काम पूर्ण करावे अशी मागणी भाविकांनी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT