Chinchani Village Saam tv
महाराष्ट्र

Chinchani Village : दोनशे लोकवस्तीच्या गावात एक कोटीची उलाढाल; वर्षभरात चिंचणीला २५ हजार पर्यटक दाखल

Pandharpur News : महाबळेश्वर तालुक्यातील धरणग्रस्तांचे पंढरपूर तालुक्यातील चिंचणी येथे पुनर्वसन झाले ग्रामस्थांनी ४५ वर्षामध्ये गावचा मेक ओव्हर केला त्यामुळे पुनर्वसन ओळख पुसली असून प्रती महाबळेश्वर वेगळी ओळख

भारत नागणे

पंढरपूर : प्रतिमहाबळेश्वर अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या चिंचणी येथील कृषी ग्रामीण पर्यटन केंद्र आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरू लागले आहे. यामुळे याठिकाणी वर्षभरात सुमारे २५ हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. या दोनशे लोकवस्ती असलेल्या गावात मागील तीन वर्षामध्ये कृषी पर्यटनातून एक कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. या छोट्याशा गावाने अल्पावधीत  पर्यटन केंद्र म्हणून राज्यात आपली वेगळी ओळख तयार केली आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील धरण ग्रस्तांचे पंढरपूर तालुक्यातील चिंचणी येथे पुनर्वसन झाले आहे. येथील ग्रामस्थांनी गेल्या ४५ वर्षामध्ये गावचा मेक ओव्हर केला आहे. त्यामुळे या गावची पुनर्वसन ही ओळख पुसली असून प्रती महाबळेश्वर अशी वेगळी ओळख तयार केली आहे. येथील ग्रामस्थांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत करुन चिंचणी गावच्या १५ एकर गावठाणामध्ये कृषी ग्रामीण पर्यटन केंद्र तयार केले आहे. 

पर्यटन विभागाकडूनही सोयीसुविधा 

येथील पर्यटन केंद्राला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाने ग्रामीण पर्यटन केंद्र म्हणून गावाला मान्यता दिली आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातूनही अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या जात आहेत. याशिवाय स्थानिक आमदार आणि खासदारांनीही येथील पर्यटन केंद्रासाठी मोठा निधी दिली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्यासाठी विश्रामगृह उभारण्यात आले आहे. शिवाय पोहण्यासाठी जलतरण तलावाचे काम सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून येथील ग्रामस्थांनी ग्रामीण संस्कृतीचे जतन आणि संवर्धन ही करण्याचा प्रयत्न केला आहे.

१३ हजाराहून अधिक झाडे लावली 

याठिकाणी गावच्या संपूर्ण परिसरात सुमारे १३ हजाराहून अधिक झाडांची लागवड केली आहे. यामध्ये बहुतांश फळ झाडांचा समावेश आहे. येथे घनदाट अशी वृक्ष- वेली बहरल्याने येथे आलेल्या पर्यटकांना प्रति महाबळेश्वरमध्ये आल्याचा अनुभव मिळतो. त्यामुळे अनेक पर्यटक येथे खास आनंद घेण्यासाठी येतात.

ग्रामस्थांना ३० लाखांचा फायदा 
गेल्या वर्षभरामध्ये राज्यभरातून सुमारे २५ हजाराहून अधिक पर्यटकांनी चिंचणी गावाला भेट दिली आहे. मागील तीन वर्षामध्ये तब्बल १ कोटीची आर्थिक उलाढाल झाली आहे. यातून येथील स्थानिक ग्रामस्थांना सुमारे ३० लाख रुपयांचा फायदा झाला आहे. येथील कृषी ग्रामीण पर्यटनामुळे सुमारे १५० ते २०० ग्रामस्थांना रोजगाराच्या नवीन संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT