Chandrakant Patil Saam tv
महाराष्ट्र

Chandrakant Patil News : माढ्याच्या उमेदवारीचा तिढा तिन्ही पक्षाचे नेते बसून सोडवतील; संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील

Pandharpur News : लोकसभा निवडणुकीची भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघाचा सर्वे पूर्ण झालेला आहे.

भारत नागणे

पंढरपूर : माढा लोकसभा मतदार संघात भाजपकडून कोणत्याही उमेदवाराचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. (Pandharpur) तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसून उमेदवार निश्चित करतील; असे विधान ही संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज पंढरपुरात केले. (Maharashtra News)

माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि (BJP) भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादावर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणुकीची भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघाचा सर्वे पूर्ण झालेला आहे. तथापी राज्यातील कोणत्याही लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावाचा निर्णय अद्याप झालेला नाही. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसून लवकरच उमेदवारीचा निर्णय घेतील; अशी माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

अकलूजच्या मोहिते पाटलांच्या नाराजीकडे लक्ष वेधले असता, माढ्यात उमेदवारीवरून निर्माण झालेला तिढा राज्याचे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे सोडवतील. माढ्यातील उमेदवाराचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे मोहिते पाटलांची काही प्रमाणात नाराजी असेल, तर त्यावरही पक्षातील प्रमुख नेते एकत्रित बसून मार्ग काढतील असे आश्वासन ही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्यू, वाचून संताप येईल

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

SCROLL FOR NEXT