Pandharpur Ashadhi Yatra Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Ashadhi Yatra : आषाढी यात्रेवर पुराचे सावट; मुसळधार पावसामुळे उजनी धरण ७४ टक्के भरले, भीमा नदीत होणार विसर्ग

Pandharpur News : पंढरपूरची आषाढी यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. आषाढी यात्रेसाठीचे सर्व नियोजन व तयारी झाली आहे. शिवाय आतापासून भाविकांचा दर्शनासाठी येण्याचा ओघ सुरु झाला आहे

भारत नागणे

पंढरपूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दोन दिवसात धरणात ७५ टक्के भरले असून असाच पाऊस काही दिवस सुरू राहिला; धरण पूर्ण भरून नदीत विसर्ग करावा लागणार आहे. परिणामी आषाढी यात्रेवर पुराचे सावट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

पंढरपूरची आषाढी यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. आषाढी यात्रेसाठीचे सर्व नियोजन व तयारी झाली आहे. शिवाय आतापासून भाविकांचा दर्शनासाठी येण्याचा ओघ सुरु झाला आहे. दरम्यान मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक भागात पर्जन्य परिस्थिती आहे. प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दौंड येथून उजनी धरणात सुमारे ५८ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. 

भीमा नदीत ४० हजार क्युसेकने होणार विसर्ग 

दोन दिवसांमध्ये उजनी धरण जवळपास ७५ टक्के भरेल अशी शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यातच वीर धरणातून नीरा नदीत २ हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. उजनी धरण ७४ टक्के भरल्यानंतर भीमा नदी पात्रात पाणी सोडले जाईल असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यापूर्वीच सांगितले आहे. जर उजनी धरणातून किमान ४० हजार क्युसेक इतका विसर्ग भीमा नदी पात्रात सोडला; तर पंढरपुरात चंद्रभागा नदी दूथडी भरून वाहते. 

तर पंढपुरात पूरस्थिती 

चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहिल्यास नदीकाठच्या सर्व घाटांना पाणी लागते. मंदिरेही पाण्याखाली जातात. दगडी पूल पाण्यात खाली गेल्याने तो बंद करावा लागतो. ऐन आषाढीच्या तोंडावर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले, तर पंढरपुरात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आषाढी यात्रेवर पुराचे सावट येण्याची दाट शक्यता आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेसेनेचे आमदार शिंदेंवर नाराज? राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय

Mumbai Kabutarkhana: कबुतरांविरोधात मराठी एकीकरण रस्त्यावर, कबुतरखान्याचा वाद आणखी तापणार

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का; बडा नेता फुटला, भाजपमध्ये प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: सांगलीचे सगळ्यात जास्त वाटोळ जयंत पाटील यांनी केले

Knee Pain: सतत गुडघे दुखणे हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण आहे?

SCROLL FOR NEXT