Kartiki Yatra 2023 Saam tv
महाराष्ट्र

Kartiki Yatra 2023 : कार्तिकी यात्रेत विठुरायाच्या चरणावर ४ कोटी ७७ लाखाचे दान

Pandharpur News : गतवर्षीच्या कार्तिकी यात्रेमध्ये मंदिर समितीला ३ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न, तुलनेने यंदाच्या कार्तिकीमध्ये तब्बल १ कोटी ५६ लाखांची भरघोस अशी वाढ

भारत नागणे

पंढरपूर : गरीबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाची श्रीमंती वाढू लागली आहे. कार्तिकी यात्रेदरम्यान (Kartiki Yatra) दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी विठुरायाच्या खजिन्यात सोने- चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेचे भरभरुन दान टाकले आहे. (Pandharpur) यात्रा काळात मंदिर समितीला ४ कोटी ७७ लाख रुपयांचे भरघोस असे उत्पन्न मिळाले आहे. (Tajya Batmya)

कार्तिकी यात्रेचा सोहळा नुकताच मोठ्या भक्तीभावाने लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यासाठी विविध राज्यातून लाखो भाविक पंढरीत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आले होते. यात्रा (Kartiki Ekadashi) काळात भाविकांनी विठुरायाच्या दानपेटीत भरभरून दान अर्पण केले आहे. १४ ते २८ नोव्हेंबर दरम्यानच्या यात्रा काळात विठ्ठल मंदिर समितीला देणगी, लाडूप्रसाद, भक्तनिवास, महानैवद्य, मोबाईल लाॅकर, ऑनलाईन देणगी, सोन-चांदी भेट, विधी उपचार, महावस्त्र व फोटो विक्री आदींमधून ४ कोटी ७७ लाख २१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गतवर्षीपेक्षा दीड कोटी अधिक दान 

गतवर्षीच्या कार्तिकी यात्रेमध्ये मंदिर समितीला ३ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तुलनेने यंदाच्या कार्तिकीमध्ये तब्बल १ कोटी ५६ लाखांची भरघोस अशी वाढ झाली आहे. यात्रा काळात भाविकांचे पदस्पर्श दर्शन सुलभ व्हावे; यासाठी दर्शनबारीची चांगली सोय केली होती. त्यामुळे यंदाच्या वारीत ३ लाख ४० हजार ४७८ भाविकांनी दर्शन रांगेतून विठुरायाचे पदस्पर्शन घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Party Wear Blouse: पार्टी वेअर साडीला मिळेल खास लूक! ब्लाउज हे 7 फॅन्सी डिझाइन्स नक्की ट्राय करा

Kanya Pujan 2026 : कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं? २ ते १० वर्षांच्या कन्यांच्या पूजेचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Maharashtra News Live Update: ठाण्यात उन्नत मार्गाचा लोखंडी सांगाडा कोसळला

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शिंदेसेनेचा दिग्गज नेता फोडला, ५ नगरसेवक अन् २०० पदाधिकाऱ्यांसह हाती घेतलं कमळ

Skin Glow Drink : फक्त ७ दिवसांत ब्रायडल ग्लो हवाय? 'हे' सोपे अन् जादुई ड्रिंक पिऊन तर पाहा

SCROLL FOR NEXT