Pandharpur Abhijit Patil saam TV
महाराष्ट्र

Pandharpur: विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या घरासह ऑफिसवर IT ची छापेमारी

आयकर विभागाने सुरु केलेल्या या छापेमारीमुळे पंढरपूरातील कारखानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

भारत नागणे

पंढरपूर: पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या घरासह ऑफीस, कारखाने आणि पतसंस्थांवर आयकर विभागाकडून (Income Tax Department) छापेमारी सुरु करण्यात आली आहे. आयकर विभागाने सुरु केलेल्या या छापेमारीमुळे पंढरपूरातील कारखानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Vitthal Cooperative Sugar Factory)

अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांचे अनेक साखर कारखाने आहेत. पाटील यांनी काहि दिवसांपुर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकत ते कारखान्याचे अध्यक्ष झाले होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासह आयकर विभागाकडून पाटील यांच्या पंढरपूर, उस्मानाबाद, धाराशिव अशा अनेक ठिकाणच्या कारखान्यांवर देखील कारवाई सुरु आहे.

दरम्यान अभिजीत पाटील यांच्यावर सुरु झालेल्या छापेमारीमुळे पंढरपूर (Pandharpur) जिल्ह्यातील साखर उद्योगामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही छापेमारी सुरु असताना त्यांच्या ऑफिसबाहेर मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे.

धाराशिव साखर कारखान्यावरही छापा -

पाहा व्हिडीओ -

उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यावर (Dharashiv Sugar Factory) देखील आयकर विभागाची धाड पडली आहे. आज पहाटे पासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरु केली आहे. अभिजीत पाटील हेच या कारखान्याच्या चेअरमन आहेत.

अभिजीत पाटील यांची ओळख साखर सम्राट निर्माण झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत 21 पैकी 20 जागा जिंकल्याने पाटील प्रकाशझोतात आले होते. तसेच त्यांच्या ताब्यात एकूण 5 कारखाने आहेत वाळू ठेकेदार ते साखर सम्राट असा अभिजीत पाटील यांचा प्रवास आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission :...नाही तर माफी मागावी लागेल; निवडणूक आयोगाची राहुल गांधींना ७ दिवसांची डेडलाईन

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

SCROLL FOR NEXT