धक्कादायक! बापानेच केला मुलाचा खून  भारत नागणे
महाराष्ट्र

धक्कादायक! बापानेच केला मुलाचा खून

अकलूज येथील धक्कादायक घटना...

भारत नागणे

पंढरपूर - अकलूज (Akluj) येथे एक धक्कदायक घटना घडली आहे. बापानेच स्वतःच्या 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे समोर आला आहे. अलोक सावंत असं मृत मुलाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे.

हे देखील पहा -

याप्रकरणी संशयित आरोपी प्रशांत सावंत या निर्दयी बापाच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत १२ वर्षीय मुलाला गुटखा खाण्याचे व्यसन होते. तो सतत गुटखा खात असे.‌ या शिवाय तो चोऱ्या देखील करत होता. दोन वेळा त्याने चोरी‌ केल्याची कबुली देखील दिली होती.

दोन दिवसा पूर्वी मयत अलोकने अकलूज येथील धाईंजे यांच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली होती. त्याच्या चोरीच्या सवयीने घराची बदनामी झाल्याच्या रागातून आरोपीने मुलगा अलोक यास बाहेर खायला जाऊ असे सांगत त्यास घराबाहेर नेले. त्यानंतर श्रीराम थेटर जवळ झुडपात नेऊन त्याचा गळा दाबून खून केला. या प्रकरणी मुलाची आई भारती सावंत यांनी आरोप पतीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी प्रशांत सावंत यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Beed Crime: वेळेवर पैसे देता येत नसेल तर तुझी बायको...; सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; बीड हादरले

Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो

SCROLL FOR NEXT