Accused arrested in Pandharpur cyber harassment case after sending obscene messages and explicit photos to a married woman on Facebook. saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Shocking : फोटो-व्हिडिओ पाहिलेत का? नराधमाने पाठवलेले अश्लील मेसेज पाहताच महिला भडकली, पोलिसांत गुन्हा दाखल

Man Sends Obscene Photos To Married Woman On Facebook In Pandharpur: पंढरपूरमध्ये विवाहित महिलेला फेसबुकवरून अश्लील मेसेज आणि नग्न फोटो पाठवून त्रास देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Omkar Sonawane

भरत नागणे, साम टीव्ही

पंढरपूर शहरात एका विवाहित महिलेला सोशल मीडियावरून अश्लील मेसेज आणि नग्न फोटो पाठवून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सोलापूर येथील एका तरूणाविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

अजर मस्जिद शेख (वय 28, रा. न्यू जिंदगी चौक, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 4 मार्च ते 29 मार्च दरम्यान पंढरपूरमधील एका विवाहित महिलेच्या फेसबुक अकाऊंट वारंवार अश्लील मेसेजेस पाठवले. तसेच नग्न स्वरूपातील फोटो पाठवून तिला त्रास दिला.

इतकेच नव्हे तर, तुम्ही फोटो ओपन केला का? आणखी व्हिडिओ आणि फोटो पाठवू का? असे मेसेज पाठवत आरोपीने महिलेला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. अखेर या प्रकाराला कंटाळून संबंधित महिलेनं पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत आरोपीला ताब्यात घेतले असून सदर घटनेचा पोलीस तपास करत आहेत. याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी सांगितले की, सायबर माध्यमातून होणाऱ्या अशा प्रकारच्या गुन्ह्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान अधिक मासातील पद्मीनी एकादशीचा सोहळा आज पंढरपुरात साजरा होत आहे. तसेच आज बकरी ईद देखील असल्याने पंढरपुरमधील मुस्लिम धर्मीय नागरिकांनी बकरी ईदची कुर्बानी न देण्याचा एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय. पंढरपुरात वारकरी सांप्रदायाला मांस वर्ज आहे. त्यामुळेच विठ्ठल भक्त असणाऱ्या मुस्लिम धर्मीय बांधवांनी आजची बकरी ईद उद्या साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नमाज पठाणासह सर्व धार्मिक कार्यक्रम उद्याच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे येथील कुख्यात आदेकर टोळीतील 5 जणांना नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक....

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी करूनही लाडकींचे पैसे अकडलेत? ₹१५०० कधीपासून मिळणार? सरकारने दिली महत्वाची अपडेट

CM थलपती विजय दिल्लीत, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

हार्बर मार्गावरून लवकरच धावणार जलद लोकल; कसा असेल संपूर्ण प्रकल्प? महत्त्वाची माहिती समोर

प्रसिद्ध दिग्दर्शकानं घराच्या छतावरून उडी मारून जीवन संपवलं; पोलिसांना सापडली सुसाईड नोट

SCROLL FOR NEXT