Pandharpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Crime : पंढरपुर हादरले! माय लेकाची घरात घुसून हत्या; मारेकरी घराला कुलूप लावून पसार

Pandharpur News : दोघेजण घरात असताना त्यांना घरी धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे. त्यामध्ये लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार झाले आहेत. तर सुरेखा जगताप त्यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आले

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर शहर दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. या घटनेत माय लेकाची दुहेरी हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान घरात घुसून शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली असून मारेकरीने घराला कुलूप लावून पसार झाला आहे. यामुळे हत्या कोणी आणि कोणत्या कारणातून केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

पंढरपूरच्या कुंभार गल्लीत सदरची घटना रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून यात कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप असे मृत मायलेकांचे नाव आहे. लखन आणि त्यांनी आई सुरेखा हे दोघेजण घरात असताना त्यांना घरी धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे. त्यामध्ये लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार झाले आहेत. तर सुरेखा जगताप त्यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आले. 

हत्येचे कारण गुलदस्त्यात 

दरम्यान लखनचे वडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र लखन आणि सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कोणी केली? कुठल्या कारणावरून झाली? याबाबत कुठलीच ठोस अशी प्राथमिक माहिती पुढे आली नाही. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे.

दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाखांची रक्कम लंपास
संभाजीनगर : शिरेगाव येथील शेतकरी सुरेश जगन्नाथ काहाळे यांनी लासुर स्टेशन येथील वैजापूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेतून अडीच लाख रुपये काढले. काढलेली रक्कम सेंट्रल बँकेत भरण्यासाठी गेले. बँकेतील कर्मचारी जेवणासाठी गेले असल्याने जगन्नाथ कहाळे यांनी पैसे दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. दुचाकी पंचर झाल्याने सावंगी चौक येथील पंचरच्या दुकानासमोर लावली. यावेळी अज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Tenancy Agreements : भाडेकराराची नोंदणी ऑनलाइनच, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT