Pandharpur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : मंगळवेढ्याजवळ एकाच कुटुंबातील 3 महिलांचा खून, सोलापूर जिल्ह्यात खळबळ

या प्रकरणी नंदेश्वर गावात राहण्याऱ्या एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भारत नागणे

Pandharpur Crime News : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या तिहेरी हत्याकांडाने सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नंदेश्वर गावात राहण्याऱ्या एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पाली माळी, पारुबाई माळी आणि संगीता माळी अशी खून झालेल्या महिलांची नावे आहेत. आरोपीने धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल (२१ फेब्रुवारी) सायंकाळी समोर आली आहे.

महादेव माळी यांचा हॉटेल व्यवसाय असून त्यांची आईचे निधन झाल्यानंतर, आपल्या आईच्या अंत्यविधीसाठी महादेव माळी यांच्या बहिणी संगीता माळी आणि पारूबाई माळी नंदेशवर येथे आल्या होत्या. त्यांचा मुलगा बाळू माळी बाहेरगावी गेल्याची संधी‌‌ साधून अज्ञाताने तीन महिलांवर वार करून त्यांचा खून केला आहे. दरम्यान, पोलिसांनी (Police) या घटनेचा तपास सुरू केला आहे.

या तिन्ही महिलांचा खूना का करण्यात आला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या तिन्ही महिला आपल्या घरासमोरील अंगणात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या असता त्यांना तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच तिघींचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. या तिहेरी हत्याकांडाने सोलापूर (Solapur) जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Crime: पत्नीचा राग मुलींवर; बापानेच घेतला दोन चिमुकल्या जुळ्या मुलींचा जीव

Maharashtra Live News Update: दौंड नगरपालिकेत मतदार यादी वरून राडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

Kalyan: कल्याणमधील मोहने राडा प्रकरणाला राजकीय वळण, शिंदेसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण

Spruha Joshi Photos: कानात झुमके, कपाळी बिंदी अत्यंत सुंदर दिसतेय मराठमोळी अभिनेत्री

Home Vastu Tips: घरातील देवघरात 'या' वस्तू ठेवणे टाळावे, अन्यथा...

SCROLL FOR NEXT