saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur Crime: पंढरपुरात रिक्षा चालकाची निर्घृणपणे हत्या; मारेकऱ्यांनी घराच्या दरवाराजाला अडकवला पाय

Pandharpur Crime: पंढरपुरात किरकोळ वादातून एका रिक्षा चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी हत्या केल्यानंतर रिक्षा चालकाचा पाय दरवाजाला टाकला होता.

Bharat Jadhav

पंढरपुरात थरकाप उडवणारा हत्याकांड घडला आहे. एका रिक्षाचालकाची किरकोळ वादातून निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी त्याचे पाय घराच्या दरवाजाला अडवले. दरम्यान अशा भयानक हत्याकांडाच्या घटनेने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. हत्येच्या घटनेनंतर पंढरपूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार,रोहित मधुकर कोरे असे हत्या झालेल्या रिक्षा चालक तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह पंढरपूर येथील रेल्वे ट्रॅक वरती छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. रोहित मधुकर कोरे रिक्षा पंढरपूर शहारत रिक्षा चालवत होता. त्याचा काही जणांशी दारू पिऊन किरकोळ वाद झाला होता. या वादातून त्याची हत्या झाली असल्याचा संशय आहे. रेल्वे पोलिसांनी आधी बेवारस मृतदेह म्हणून त्याचा पंचनामा केला होता. मात्र तरुणांच्या घरावर त्याचा पायाचा तुकडा आढळून आल्याने रेल्वे रूळावर आढळून आलेला मृतदेह हा रोहितचा असल्याचे समोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT