Pandharpur saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढीसाठी एसटी महामंडळ सज्ज; 5000 बसेसच्या क्षमतेचे पंढरपूरात स्थानक, 34 नव्या फ्लॅटफाॅर्मची उभारणी

यंदा पंढरपूरात आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रखूमाई मंदिरात VIP दर्शन सेवा बंद राहणार आहे.

भारत नागणे

Pandharpur Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. पंढरीत येणा-या भाविकांना उत्तम सुविधा देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पंढरपूरात महाराष्ट्रातील सर्वात मोठे नवीन बसस्थानक (Pandharpur Bus Stand) उभारण्यात आले आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या बसस्थानकाची सुमारे 5000 बसेसची क्षमता आहे. (Maharashtra News)

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात महाराष्ट्रातील सर्वात मोठे नवीन बसस्थानक उभारण्यात आले आहे. या नवीन बसस्थानका वरून बस गाड्या सोडण्यात येणार आहे. सुमारे 70 हजार स्क्वेअर फूट जागेवर बसस्थानक उभारण्यात आले आहे.

दोन विभागात उभारण्यात आलेल्या या बस स्थानकात 34 प्लॅटफॉर्म तयार करण्यात आल्या आहेत. येथे येणा-या भाविकांसाठी राहण्याची सोय करण्यात आली आहे. महिला आणि दिव्यांग प्रवाशांसाठी स्वच्छतेची आणि राहण्याची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. या बसस्थानकामध्ये दुकाने ही सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे भाविकांना बसस्थनाक परिसरातच धार्मिक वस्तुंची खरेदी करणे सुलभ हाेणार आहे.

आषाढी एकादशी कधीपासून प्रारंभ?

आषाढी एकादशीचा प्रारंभ २९ जून २०२३ पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी ते समाप्तीः ३० जून २०२३ रोजी पहाटे २ वाजून ४२ मिनिटे भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आषाढी एकादशी गुरुवार २९ जून २०२३ रोजी साजरी करण्यात येईल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोपरी पाचपाखाडीत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकत्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT