Pandharpur Accident Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Accident : विठ्ठल भेटीची आस अपूर्ण; पायी दिंडीतील तरूण वारकऱ्याचा पंढरपूरजवळ अपघात

Pandharpur News : चंद्रपूर येथील आकाश कोंडलकर असं अपघातात मृत्यू झालेल्या वारकर्याचे नाव आहे. अवघ्या हाकेच्या अंतरावर पंढरी असताना वारकर्यांचा मृत्यू झाल्याचे विठ्ठल दर्शनाची आस अपूर्ण राहिली

भारत नागणे

पंढरपूर : विठ्ठल दर्शनाची आस घेऊन वारकरी पायी दिंडीत सहभागी होत पंढरपूरमध्ये येत आहेत. पायी पालखी दिंडी येत असताना अवघ्या काही अंतरावर पंढरपूर असताना दिंडीतील तरुण वारकर्याला कारने जोरदार धडक देऊन उडविले. यात चंद्रपूर येथील वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. 

चंद्रपूर येथील आकाश कोंडलकर असं अपघातात मृत्यू झालेल्या वारकर्याचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना पंढरपूर जवळच्या शेटफळ गावा जवळ घडली आहे. अर्थात अवघ्या हाकेच्या अंतरावर पंढरी असताना वारकर्यांचा मृत्यू झाल्याचे विठ्ठल दर्शनाची आस अपूर्ण राहिली आहे. आषाढी एकादशीला विठ्ठल दर्शनाच्या ओढीने पायी वारी करत वारकरी तसेच भाविक दिंड्यांमध्ये सहभागी होत पंढरपुरात येत आहे. आता या पालख्या पंढरपुरात दाखल होऊ लागल्या असून भाविकांची मांदियाळी पंढरीत पाहण्यास मिळत आहे. 

कारने दिली जोरदार धडक

दरम्यान आकाश कोंडलकर हा तरूण यवतमाळ येथील सद्गुरू जगन्नाथ महाराज पालखी सोबत पायी वारी करत पंढरपूरकडे येत होता. चंद्रपूर येथील हा तरुण मागील दहा- बारा दिवसांपासून पायी वारी करत विठ्ठल दर्शनाला येत होता. मात्र पंढरी अवघ्या हाकेच्या अंतरावर असतानाच एका भरधाव आलेल्या कारने जोरदार धडक दिली. यामध्ये आकाश यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

भरधाव मोटारसायकल उभ्या ट्रकवर आदळली

भंडारा : नवीन बायपास महामार्गावर कोरंभीजवळ रात्री  भीषण अपघात घडला. भरधाव दुचाकी उभ्या ट्रकवर आदळली. त्यात दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. सोनू केरु पालवे (वय २३, रा. गिरोला) व मृणाल अशोक मानवटकर (वय २५, रा. जाखेगाव, ता. मौदा) असे मृतकांची नावे आहेत. रात्रीच्या दरम्यान मृतक हे दुचाकीने भरधाव जात असतांना बॅरिकेट्स पाळून उभ्या ट्रकला मागून जबर धडक दिली. दुचाकी अक्षरश ट्रकच्या चाकातच शिरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाजवा रे ढोल-ताशा, T20 वर्ल्ड कप जिंकून आलाय सूर्यादादा! टीम इंडियाच्या कर्णधाराचं मुंबईत जंगी स्वागत| Video Viral

Maharashtra Live News Update : पुणे येथून अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची संगमनेर टोलनाक्यावर सुटका

युद्धाने टेन्शन वाढवलं, गणेशमूर्तींच्या पॅकेजिंगसाठी फोम मिळेना; छोटे उद्योजक हवालदील

लोकसभेत मोठा गोंधळ; प्रियंका गांधी बोलत असताना सत्ताधारी आक्रमक|VIDEO

Summer Health Tips: उन्हाळ्याच्या सुरुवातीला आरोग्याची घ्या नीट काळजी, या गोष्टी ठेवा सोबत; अन्यथा...

SCROLL FOR NEXT