Saam Impact News : विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा जीवघेणा प्रवास थांबणार; साम टीव्ही बातमीनंतर प्रशासनाला जाग, गावात जाऊन पथकाची पाहणी

Nandurbar Akkalkuwa News : अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी येथील लहान विद्यार्थी जीवघेणा प्रवास करत आहेत. नदीवर पूल नसल्यामुळे नदी पार करण्यासाठी झाडांच्या फांद्यांचा आधार घेऊन जावे लागत असते
Nandurbar Akkalkuwa News
Nandurbar Akkalkuwa NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी गावातल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणसाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. झाडाच्या फांद्यांचा आधार घेऊन विद्यार्थी मार्ग काढत होते. या जीवघेण्या प्रवासाबाबात साम टीव्हीने ग्राउंड झिरो वरून वास्तव मांडले. यानंतर प्रशासनाला जाग आली असून येथे पूल बांधणीच्या अनुषंगाने बांधकाम विभागाच्या पथकाने केलखाडी गावात जावून पाहणी केली आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी येथील लहान विद्यार्थी जीवघेणा प्रवास करत आहेत. नदीवर पूल नसल्यामुळे नदी पार करण्यासाठी झाडांच्या फांद्यांचा आधार घेऊन जावे लागत असते. विद्यार्थ्यांच्या या जीवघेण्या प्रवासाबाबत साम टीव्हीने वृत्त प्रसारित केले होते. या वृत्तानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्याबाबत आज सांगितले होते. 

Nandurbar Akkalkuwa News
Oil Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! तेलाची फोडणी महागली, एका डब्यामागे ६० रुपयांची वाढ

बांधकाम विभागाच्या पथकाकडून पाहणी 

मुख्यमंत्र्यांचे आदेश आल्यानंतर आजच शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मयुर वसावे यांच्यासह संपुर्ण पथकाने केलखाडी गावात जावून पाहणी केली आहे. या स्थळाला पोहचण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागते हीच मोठी अडसर बांधकाम विभागापु असून यातून मार्ग काडत तातडीन साकवचे काम पुर्ण केले जाणार आहे.

Nandurbar Akkalkuwa News
Cyber Crime : आयटी अभियंत्याला १ कोटी ११ लाख रुपयाचा गंडा; शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाने केली फसवणूक

उद्यापासून कामाला सुरवात 

याठिकाणी बांधकाम विभागान सर्व मोजमाप पुर्ण करुन उद्यापासूनच साकव बांधण्यासाठी आराखडा तयार केला आहे. याठिकाणी स्टील स्ट्रक्टरचा साकव उद्यापासून फेब्रीकेटर मार्फत तयार केला जाणार असुन सीमेंट कामालाही दोनच दिवसात सुरवात करण्याची तयारी बांधकाम विभागाने केली आहे. हे काम झाल्यानंतर विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत थांबणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com