Raju Shetty Saam TV
महाराष्ट्र

Raju Shetti : राजू शेट्टींचा सरकारला अल्टीमेटम...; पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्यासाठी पैसे घेतल्यास उचलणार मोठं पाऊल

केंद्र सरकारने प्रत्येक पॅनकार्ड धारकाकडून आधार लिंक करण्यासाठी १ हजार रूपयांचा कर आकारला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pan card link Aadhar Card : आयकर विभागाने देशातील ४४ कोटींहून अधिक पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅन कार्ड धारकाकडून आधार लिंक करण्यासाठी १ हजार रूपयांचा कर आकारला आहे. यामुळे देशातील जनतेवर ४४ हजार कोटीचा दरोडा पडणार आहे. असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. (Political News)

या विषयी बोलताना राजू शेट्टी यांनी पुढे म्हटलं आहे की, केंद्र सरकारने डिजीटल धोरणाच्या नावाखाली पॅनकार्ड धारक व्यक्तींनी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. केंद्र सरकारने प्रत्येक पॅनकार्ड धारकाकडून १ हजार रूपये आकारले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारून केंद्र सरकार तब्बल ४४ हजार कोटी रूपयांचा दरोडा टाकत आहेत. सध्या जनतेला कोणताही व्यवहार अथवा नोंदणी करत असताना आधार कार्ड आणि पॅन कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे.

केंद्र सरकार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जनतेकडून मोठ्या प्रमाणात कराची आकारणी करत आहे. वाढलेल्या महागाईच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. यामुळे या तुघलकी धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी व सर्वसामान्य जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी राजू शेट्टी यांनी एक मोहीम राबवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

रविवार दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत #स्टॅापरॅाबरी #stoprobbary हा संदेश ट्वीटर , फेसबुक , इन्स्टांग्रामच्या माध्यमातून पाठवायचा आहे. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या nsitharaman@nic.in या मेलवर सदर धोरणाविरोधात आपल्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत. असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Shocking : बॉयफ्रेंडशी भांडण, नैराश्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केली शेवटची पोस्ट

Dada Bhuse: मालेगावात शिक्षक भरती घोटाळा,शासनाला 2 कोटी 69 लाखांचा गंडा

Shailesh Jejurikar : मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G ला 'भारतीय' नेतृत्व; मराठमोळे शैलेश जेजुरीकर कोण आहेत? VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापूर महानगरपालिकेत 85 लाखांचा ड्रेनेज घोटाळा प्रकरण; कनिष्ठ अभियंता,वरिष्ठ लिपीक निलंबित

SCROLL FOR NEXT