Wada News Saam tv
महाराष्ट्र

Wada News : मोबदला न देताच विद्युत वाहिनी मनोरे उभारणी सुरु; शेतमालाचे नुकसान, शेतकऱ्यांचे आंदोलन

Palghar Wada News : शेत जमीनीत टाॅवर उभारण्याचे काम देखील कंपनीच्या माध्यमातून सुरू केल्याने बाधित शेतकरी हेलावून गेले असून नेमके चालले तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

वाडा (पालघर) : अति उच्चदाब क्षमतेच्या विद्युत वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम करत असताना शेतकऱ्यांना त्याचा मोबदला न देताच काम सुरु झाले आहे. दरम्यान हे काम करत असताना शेतातील शेत मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून यांच्या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी आज वाडा प्रांत कार्यालयावर समोर आंदोलन सुरु केले आहे. 

शेतकऱ्यांना मोबदला न देता तसेच कोणत्याही प्रकारची सुचना न देता अति उच्चदाब क्षमतेच्या विद्युत वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम कंपनीने सुरू केले आहेत. यामुळे शेतकरी हेलावून गेले आहे. गुजरात येथून नवसारी ते पडघा पाॅवर ग्रीड तसेच खावडा IV C पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड विद्युत वाहिनी प्रकल्प अंतर्गत अति उच्च दाब क्षमतेच्या विद्युत वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम सुरू केले आहे.  

शेतकऱ्याला सूचना किंवा मोबदला नाही 

मात्र काम सुरू करताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात जात आहे; त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुचना किंवा मोबदला दिला गेला नाही. तसेच मनोरे उभारत असताना शेतमालाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेत जमीनीत टाॅवर उभारण्याचे काम देखील कंपनीच्या माध्यमातून सुरू केल्याने बाधित शेतकरी हेलावून गेले असून नेमके चालले तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

शेतकऱ्यांचे बिऱ्हाड मोर्चा 

शेत मालाचे नुकसान होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. या शेतकऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय वाडा याठिकाणी बिऱ्हाड मोर्चा ‌आंदोलन सुरू केला आहे. शासनाने एक जिल्हा एक भाव देण्यात यावे. किमान १० लाख रुपये गुठ्ठा भाव देण्यात यावा व विद्युत प्रकल्प ग्रस्तांना शेताच्या शेतमालाचे जे नुकसान केले आहे त्याचा मोबदला देण्यात यावा; अशी मागणी देखील केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT