Palghar Accident
Palghar Accident Saam Tv
महाराष्ट्र

Palghar Accident: पालघरमध्ये एसटी बस- दुचाकीचा भीषण अपघात, डोक्यावरून बसचे चाक गेल्याने सरपंचाचा मृत्यू

Priya More

रुपेश पाटील,पालघर

पालघरमध्ये (Palghar) एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात (Palghar Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. पालघर-मनोर महामार्गावरील मनोर बाजारपेठेत (Manor Market) हा अपघात झाला आहे. भरधाव एसटी बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात सरपंच सोनाली लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताची घटना बाजारपेठेतील एका दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवाडे-नेटाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनल लोखंडे (वय 30 वर्षे) या आपल्या पती आणि दोन मुलांसोबत दुचाकीवरून चालल्या होत्या. पालघर-मनोर महामार्गावरील मनोर बाजारपेठेतून जात असताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या एसटी बसने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये चौघेही दुचाकीवरून खाली पडले. अशामध्ये सोनल लोखंडे यांच्या डोक्यावरून एसटी बसचे मागचे चाक गेले. या अपघातामध्ये सोनल लोखंडे गंभीर जखमी झाल्या.

पालघर -विक्रमगड एसटी बस ही पालघरच्या दिशेने जात असताना तिने दुचाकीला धडक दिली. अपघातात बसच्या मागच्या टायरखाली आल्याने गंभीर जखमी झालेल्या सोनल लोखंडे यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सोनल लोखंडे यांचे पती आणि त्यांची दोन चिमुकली मुलं गंभीर जखमी झाली. तिघांवर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनल यांचा एक वर्षाचा मुलगा तनिष लोखंडेला पुढील उपचारासाठी सेल्वासा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास बाजारपेठेतील जनता पतपेढीसमोर हा अपघात झाला. या अपघाताची घटना दुकानामध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली. गोवाडे- नेटाळी ग्रामपंचायतीच्या 2022 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवणुकीत थेट सरपंचपदी सोनल लोखंडे यांची निवड करण्यात आली होती. या घटनेमुळे गोवाडे-नेटाळी गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताचा तपास पालघर पोलिसांकडून सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, सुनील तटकरेच्या कार्यकर्त्यांना सूचना

Coffee पिणं आरोग्यासाठी गुणकारी?

Mumbai News: PM मोदींचे शिवाजी पार्क परिसरातील कटआऊट्स हटवले, निवडणूक आयोगाची कारवाई

Pimpri-Chinchwad Hoarding Collapsed : पिंपरी-चिंचवड शहरात कोसळलं भलं मोठं होर्डिंग; दुचाकींसह वाहनं दबल्याची भीती, पाहा Video

Shahada News : शहाद्यात महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास

SCROLL FOR NEXT