Dhule Crime News : गुटख्याच्या ट्रकसह दाेघे ताब्यात, 10 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त; धुळे पोलिसांची धडक कारवाई

सुरत वरून धुळे तालुक्यातील कुसुंबा मार्गे मालेगावकडे येत असलेला प्रतिबंधित गुटखा संदर्भात पाेलिसांनी गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर तालुका पोलिस अधिकाऱ्यांनी सापळा रचला.
dhule police seized gutkha worth rs 10 lakh 62 thousand
dhule police seized gutkha worth rs 10 lakh 62 thousandSaam Digital

Dhule :

धुळे तालुका पोलिसांनी अवैधरित्या गुटखा तस्करी राेख लाखाे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी दाेघांना ताब्यात घेतले आहे. या दाेघांच्या चाैकशीनंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तवली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुप्त माहितीदारातर्फे मिळालेल्या माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांनी सापळा रचून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची अवैधरित्या होत असलेली तस्करी रोखली. यामध्ये लाखो रुपयांच्या मुद्देमाला सकट दोघा जणांच्या मुसक्या देखील पोलिसांनी आवळल्या आहेत.

dhule police seized gutkha worth rs 10 lakh 62 thousand
नाशिक : कांद्यावरील निर्यातबंदी उठवा, केंद्राच्या कांदा खरेदी याेजनेला शेतक-यांचा विराेध

सुरत वरून धुळे तालुक्यातील कुसुंबा मार्गे मालेगावकडे येत असलेला प्रतिबंधित गुटखा संदर्भात पाेलिसांनी गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर तालुका पोलिस अधिकाऱ्यांनी सापळा रचला. (Maharashtra News)

त्यात पोलिसांनी ट्रकसह 10 लाख 62 हजार 874 रुपये किमतीचा गुटखा व मुद्देमाल पकडला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

dhule police seized gutkha worth rs 10 lakh 62 thousand
Success Story: 15 हजार रुपयांत मिळविले लाखाचे उत्पन्न, वाचा युवा शेतक-याची यशाेगाथा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com