Wada Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Wada Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी बोरिंगवर रात्रभर जागरण; भीषण पाणीटंचाईने महिला त्रस्त

Palghar News : रात्री १ वाजता सुध्दा महिला बॅटरीच्या उजेडात बोरिंगवरून पाण्याचे हांडे ,प्लास्टिकचे ड्रम घेऊन रात्र बोरवेल किंवा विहीरीवर काढावी लागत आहे. हे चित्र रोजच पाहण्यास मिळत आहे

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

वाडा : उन्हाची तीव्रता वाढत असताना पाण्याची समस्या देखील गडद होत चालली आहे. यामुळे दूरवरून पाणी आणण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हीच परिस्थिती वाडा तालुक्यात निर्माण झाली असून काळ्याकुट्ट अंधारात पाण्यासाठी बोरिंगवर रात्र रात्रभर जागून महिलांना पाणी आणावे लागत आहे. भीषण पाणी टंचाईचे चटके जाणवत असल्याने परिसरात हे भीषण चित्र पाहण्यास मिळत आहे. 

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पन्नास घरांची लोकवस्ती असलेल्या नदीचापाडा या गावात भीषण पाणीटंचाईला महिलांना सामोरे जावे लागत आहे. दिवसभर कामाला जावे लागत असल्याने दूरवरून पाणी आणणे शक्य नाही. यामुळे रात्री १ वाजता सुध्दा महिला बॅटरीच्या उजेडात बोरिंगवरून पाण्याचे हांडे, प्लास्टिकचे ड्रम घेऊन रात्र बोरवेल किंवा विहीरीवर काढावी लागत आहे. हे चित्र रोजच पाहण्यास मिळत आहे.  

रात्रीही पाण्यासाठी धडपड 

पंधरा मिनिटे बोरिंग हापसल्या नंतर एक हंडा पाणी मिळते, तर कधी मिळत पण नाही. बोरिंगला पाणी गढूळ येते. तेच पाणी पिण्यासाठी वापरले जात असते. त्यामुळे गावातील लहान मुले आजारी पडत असल्याचे येथील महिला सांगतात. रात्र ते दिवसभरपर्यंत महिलांना  पाण्यासाठी धडपड करावी लागते. कधी तर बाहेर गावातून पिण्याचे पाणी वीस रुपये देऊन विकत आणावे लागत असल्याची वेळ येथील नागरिकांवर येत आहे. 

निवडणुकीपुरते आश्वासन 

पाण्यावरून महिलांचे भांडण पण होतात. पाणी पुरवठा करणाऱ्या बाबत ग्रामस्थांनी अनेक तक्रारी दिल्या आहेत. मात्र प्रशासनाने या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. निवडणूक आली की आश्वासन देतात नंतर कोणी येत नाही. यामुळे येथील पाण्याची भीषणता राजकारण्यांना कोठून समजणार अशी संतप्त प्रतिक्रिया येथील महिलांकडून व्यक्त केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये 300 स्टेडियम उभारायचे आहे - नितीन गडकरी

कोण संजय राऊत? मी नाही ओळखत; आरोपांवर भडकले श्रीकांत शिंदे | VIDEO

Mumbai Pune Expressway वर अपघाताचा थरार! कंटेनरचा ब्रेक फेल झाला अन् ७-८ वाहने एकमेकांना धडकली, अपघातात महिलेचा मृत्यू

Saam Impact: हॉटेलवरील गुजराती पाट्या काढून लावल्या मराठी पाट्या; साम टीव्हीच्या दणक्यानंतर आली जाग|VIDEO

Maharashtra Politics : दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री, सहकारासाठी योगदान काय? विखे पाटलांची नाव न घेता शरद पवारांवर टीका

SCROLL FOR NEXT