फैय्याज शेख
मोखाडा (पालघर) : रस्त्यापासून पाण्यापर्यंत आणि शाळांपासून आरोग्या पर्यंत सगळ्याच गोष्टींचे दुर्भिक्ष असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यात माता मृत्यू व बालमृत्यूचा फेरा कायम आहे. दोन महिन्यांपूर्वीच माता मृत्यू व बालमृत्यूने तालुका हादरला होता. यात आता एक प्रकरण समोर आले आहे. एनआयसीयूची सुविधा मिळवण्यासाठी या बाळाला तब्बल १०० किलोमीटरचा प्रवास करावा लागला; तरीही बाळाचा जीव वाचू शकले नाही.
राज्यातील आदिवासी भाग असलेल्या परिसरात आजही रस्ता, पाणी, आरोग्य सुविधांचा अभाव पाहण्यास मिळतो. आरोग्य सुविधा नसल्याने रुग्णांना शहरात उपचारासाठी न्यावे लागत असते. यामुळे बऱ्याच अशा दुर्घटना देखील घडल्या आहेत. प्रामुख्यानं पालघर, नंदुरबार जिल्ह्यात हे चित्र पाहण्यास मिळते. अशातच पालघर जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी माता व बालमृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. यानंतर पुन्हा एकदा उपचाराअभावी नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
जन्मानंतर बाळाला श्वास घेण्यास त्रास
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील किनिस्ता गावातील योगिता सचिन पुजारी ही महीला प्रस्तुतीसाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रस्तुती देखील सुखरूप झाली होती. जन्माच्या वेळी बाळाचे वजन तीन किलो होते. मात्र संध्याकाळी बाळाला श्वास घ्यायला अडचण निर्माण झाली. म्हणून बाळाला व माता यांना जव्हार येथील पतंगशहा कुटीर रूग्णालयात हलविण्यात आले.
अखेर बाळाचा मृत्यू
मात्र तेथे देखील उपयुक्त सुविधा व यंत्रणे नसल्याने अखेर बाळाला उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. तेथे पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करत बाळाला मृत घोषित केले. यामुळे पुन्हा एकदा जव्हार मोखाडा तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेबाबतची अनास्था समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वी साम टिव्ही ने माता व बाल मृत्यू बाबतच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या ते शासन खडबडून जागे झाले होते. मात्र आता पुन्हा आरोग्य व्यवस्थेबाबतचा बोजवाढा समोर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.