Palghar News KSRTC Women Conductor Death on Duty Shocking incident Saam TV
महाराष्ट्र

Women Conductor Death: महिला कंडक्टरचा ड्युटीवर असताना अचानक मृत्यू; पालघरमधील खळबळजनक घटना

Palghar Women Conductor Death on Duty: पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर आगारातील एका एसटी बस महिला वाहकाचा ड्युटीवरच मृत्यू झाला आहे.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

Palghar Women Conductor Death on Duty: पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर आगारातील एका एसटी बस महिला वाहकाचा ड्युटीवरच मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि. २१) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. मंदा गुरुनाथ काळे असं मृत महिलेचे नाव आहे. मंदा काळे अविवाहित असून ही वाडा तालुक्यातील सापने गावची रहिवाशी होत्या. (Latest Marathi News)

त्यांच्या अचानक मृत्युने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, मंदा काळे पालघर आगारात (Palghar News) महिला वाहक म्हणून कार्यरत होत्या.

सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या. पालघर ते सातपाटी अशा दोन फेऱ्या मारल्यानंतर त्यांना पालघर ते कल्याण अशी ड्युटी करायची होती. तत्पूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने विश्रामगृहात त्यांनी थोडासा आराम केला.

मात्र, अचानक मंदा यांच्या प्रकृती खालावली. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोर येथील रुग्णालयात प्राथामिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना सिल्वासा येथे हलवण्याचा सल्ला दिला.

परंतु रुग्णवाहिकेतून नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. आपल्या सहकारी मैत्रिणीच्या निधनाचे वृत्त समजताच तिच्यासोबत काम करणाऱ्या महिला वाहकांनी आपले कर्तव्य बाजूला ठेवून घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT