Palghar Girgaon Ashram School Saam TV
महाराष्ट्र

Palghar News : गिरगाव आश्रम शाळेतील १५ विद्यार्थ्यांना Swine Flu ची लागण

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना झिका आणि स्वाईन फ्ल्यू झाली होती.

रुपेश पाटील

पालघर : पालघर (Palghar) जिल्ह्यातील गिरगाव आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यूची बाधा झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना (Students) उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या वसतीगृहात 228 मुलं-मुली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. (Palghar Latest News)

खबरदारी म्हणून वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरविले जात आहे. यापूर्वी डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तलासरी झाई येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना झिका आणि स्वाईन फ्ल्यू झाली होती.

गिरगाव आश्रम शाळेतील मुलामुलींच्या वसतिगृहातील 22 विद्यार्थ्यांची आजारी असल्याने तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 14 मुली आणि एक मुलगा अशा 15 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे तपासणी अंती समोर आले आहे. (Palghar Todays News)

तर तीन विद्यार्थ्यांना डेंग्यू आणि उर्वरित विद्यार्थी व्हायरल इन्फेक्शने आजारी असल्याचे समोर आले होते. सध्या स्वाईन फ्ल्यू झालेल्या विद्यार्थ्यांची उपचारानंतर प्रकृती स्थिर असून खबरदारी म्हणून त्यांना वसतीगृहातच विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT