Jawar News Saam tv
महाराष्ट्र

Jawar News : भाजीपाल्याच्या कॅरेटमधून अंमली पदार्थ वाहतूक; जव्हार पोलिसांच्या कारवाईत १२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Palghar News : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका व शहराच्या सीमा भागांत नियमितपणे नाकाबंदी करण्यात येत आहे. दरम्यान शनिवारी संध्याकाळी ६ वाजता शिवनेरी ढाबा, डहाणू नाका येथे पीकअप गाडी निदर्शनास आली.

Rajesh Sonwane

फय्याज शेख 
जव्हार
: जव्हार तालुक्यातील शिवनेरी ढाबा डहाणू नाका येथे सुमारे १२ लाख रुपयांचा अमली पदार्थ, गांजा हस्तगत करण्यात आला आहे. हि कारवाई जव्हार पोलिसांकडून करण्यात आली असून जिल्हा भरात एवढी मोठी कारवाई झाल्याने संपूर्ण पालघर जिल्हाभरातून पोलीस यंत्रणेचे कौतुक होत आहे.

पालघर (Palghar) जिल्ह्यातील जव्हार तालुका व शहराच्या सीमा भागांत नियमितपणे नाकाबंदी करण्यात येत आहे. दरम्यान शनिवारी संध्याकाळी ६ वाजता शिवनेरी ढाबा, डहाणू नाका येथे पीकअप गाडी निदर्शनास आली. या गाडीची तपासणी केली असता यात भाजीपाल्याचे प्लास्टिक कॅरेट आढळून आले. मात्र पोलिसांच्या (Police) पथकाला संशय आल्याने गाडीची तपासणी केली असता यातील सहा प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये ३१ किलो ८६८ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा ज्याचे एकूण मूल्य सात लाख ९७ हजार चारशे पन्नास रुपये इतके आहे. यानंतर पोलिसांनी हा गांजा जप्त केला आहे. 

दोघांना घेतले ताब्यात 

याशिवाय पोलिसांनी पीकअप वाहन मूल्य तीन लाख पन्नास हजार आणि तीन हजार रुपये किमतीचे ६० प्लास्टिक कॅरेट असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात सुनील तुकाराम आर्य (वय २४), श्रीराम दिनेश सोलंकी (वय २१, दोघेही राहणार मध्यप्रदेश) याना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Saree Designs: डेली वेअरसाठी या आहेत युनिक आणि ट्रेडिंग 5 साड्या

Daily Yoga Workout: फिट राहण्यासाठी रोज करा हे 4 योगा

दोरखंड बांधून उखाडला अख्खाच्या अख्ख्या लाखोंचा खजिना; चोरट्यांनी पळवलं SBIचं एटीएम, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या ३ ते ४ दिवसात मिळणार ३००० रुपये?

Shepu Batata Bhaji Recipe: शेपू बटाटा भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT