Palghar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Palghar Crime News: पालघरमध्ये भाजप जिल्हाध्यक्षावर ॲट्रॉसिटी गुन्हा; आदिवासी तरुणाला मारहाण केल्याचा आरोप

Crime News: आदिवासी समाजातील इसमाला आपल्या कार्यालयात बोलवून मारहाण आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Palghar News: पालघरचे भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, भाऊ जगदीश राजपूत यांच्यासह आणखी दोघांवर ॲट्रॉसिटीसह विविध कलमांअंतर्गत डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आदिवासी समाजातील इसमाला आपल्या कार्यालयात बोलवून मारहाण आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

एका स्थानिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला घरी बोलवल्याच्या रागातून राजपूत यांनी ही मारहाण केली, असं फिर्याद प्रकाश ठाकरे यांनी म्हटलं आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात जिल्हाध्यक्ष भरत रजपूत , भाऊ जगदीश राजपूत यांच्यासह आणखी दोघांवर भा.द. वि . कलम 323, 504, 506(2), 34 , 3(1),(r) 3(1)(s) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून डहाणू पोलीस कार्यवाही करत आहेत.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली आहे. मारहाण झालेला व्यक्ती एक सामाजीक कार्यकर्ता आहे. आपल्या गावातील नागरिकांच्या मदतीला तो नेहमीच धावून जातो. दुपारी भरत राजपूत त्याच्या घरी गेले तसेच गावातील रस्ते आणि अन्य विकासकामे करायची असल्याने त्याला बातचीत करण्यासाठी बाहेर बोलावले.

राजपूत यांच्यासह गावातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी सायंकाळी ६.३० वाजता पुन्हा मारहाण झालेल्या व्यक्तीला बाहेर बोलावले. यावेळी जातीवाचक शब्द वापरुन भरत राजपूत, भाऊ जगदीश राजपूत यांनी मला मारहाण केली, असं मारहाण झालेल्या व्यक्तीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT