Palghar Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Palghar Crime News: प्रेमाचा भयानक शेवट! लग्नावरून वाद टोकाला गेला, प्रियकराकडून प्रेयसीची डोक्यात दगड घालून हत्या

Palghar Crime News: पालघरमध्ये एका प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली आहे. लग्नाच्या विषयावरुन त्यांच्यात वाद झाला होता. यामुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्न करण्याच्या वादातून प्रियकराने डोक्यात दगड घालून प्रेयसीची निर्घुण हत्या केली आहे. लग्नाला कुटुंबियाचा विरोध होता. त्याच वादातून प्रियकराने हे पाऊल उचलले. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पालघरमधील मुरबे येथे राहणाऱ्या सुमीत नवनीत तांडेल याचे स्नेहा पुरुषोत्तम चौधरी (वय १९) या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्यात भांडण झाल्यामुळे प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात दगड मारुन तिची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमीत हा एमआयडीसी परिसरात एका फॅक्टरीमध्ये काम करायचा. त्याच्याविरोधात कलम ३०२ आणि २०१ आयपीसीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी ९ वाजता ही घटना घटला आहेस. स्नेहा ही तारापूर एमआयडीसी काम करत होती. ती प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. त्या दोघांमध्ये काही कारणांवरुन वाद झाला.याच वादातून त्याने स्नेहाच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहाच्या कुटुंबियांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. त्यामुळे त्यांच्या लग्नाला परवानगी मिळत नव्हती. त्यावरुनच त्यांचे भांडण झाले असावे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

स्नेहा आणि तिच्या प्रियकरामधील भांडण वाढले. त्यातच त्यांने स्नेहाच्या डोक्याला मारले. तिथून बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीने हे सर्व पाहिले. त्याने बोईसर पोलिस ठाण्याला या घटनेची माहिती दिली. यावेळी सुमीतने स्नेहाला रुग्णालयात घेऊन जात असल्याचे सांगून तो तिथून निघून गेला.

याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आजूबाजूच्या रुग्णालयात तपासणी केली. परंतु त्यांनी रुग्णालयात अशी कोणतीच व्यक्ती आली नसल्याचे समजले. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने स्नेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना ज्या ठिकाणी घडली, तिथून काही किलोमीटर अंतरावर स्नेहाचे घर होते. त्यानंतर पोलिसांनी तपास घेण्यास सुरुवात केली.

मध्यरात्री २.३० मिनटांनी पोलिसांना स्नेहाचा मृतदेह सापडला. स्नेहाच्या डोक्यातून रक्त येत होते. मृतदेह तापसणीनंतर तिच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. स्नेहाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. सतपती गावातून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT