Navodaya Vidyalaya Raging Saam TV
महाराष्ट्र

Navodaya Vidyalaya Raging: नवोदय विद्यालयात चाललंय तरी काय? ११ वीच्या विद्यार्थ्यांकडून १० वीच्या विद्यार्थ्यांची रॅगिंग

Jawahar Navodaya Vidyalaya: झालेल्या प्रकाराबाबत विद्यालय प्रशासनास कल्पनाच नाही. दहावीतील 35 विद्यार्थ्यांना अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून मारहाण

Ruchika Jadhav

Palghar News:

पालघर तालुक्यातील माहीम ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात खळबळजनक घटना घडलीये. अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांना शिक्षेच्या रूपात मारहाण करून रॅगिंग करण्यात आलीये. यामध्ये एका विद्यार्थ्याच्या कानाचा पडद्याला इजा झालीये. (Latest Marathi News)

सहा दिवसांपूर्वी ही घटना घडलीये मात्र विद्यालय प्रशासनास अद्याप या प्रकरणी कुठल्याही माहिती नसल्याने पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. 30 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता रॅगिंगची घटना घडलीये. अकरावीतील सहा ते सात विद्यार्थ्यांनी उदयगिरी हाऊसमध्ये दहावीच्या 35 विद्यार्थ्यांना रात्री बाहेर बोलावले. तुम्हाला काही सूचना द्यायच्यात असं सांगून त्यांना बाहेर बोलवण्यात आलं.

सर्व विद्यार्थी बाहेर आल्यावर सूचना देण्यात आल्या. जे विद्यार्थी विद्यालयात उशिरा आले त्यांनी उभे रहायला सांगितले. उशिरा आलेले विद्यार्थी उभे राहिले. त्यानंतर प्रत्येकास बोलवत त्यांना शिक्षा देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गालावर जोरजोरात मारण्यात आले. शर्ट इन नसतात, तुम्ही बुट घालत नाहीत, मेसमध्ये आवाज असतो, तुम्ही जेवायला वेळेवर येत नाहीत ही कारणे सांगण्यात आलीत. मात्र तेही या गोष्टी पाळत नाहीत.

११ वीच्या विद्यार्थ्यांनी असं म्हटल्यावर १० वीचे विद्यार्थी देखील संतापले. ते म्हणाले, नियम फक्त आम्हीच पाळायचे का त्यांनी का नाही. त्यानंतर हा मारहाणीचा प्रकार घडला. रात्री अकरा ते बाराच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर रात्री बारा वाजता आम्हाला विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांच्या रूमवर पाठवलं.

काही वेळाने पुन्हा दुसरं कारण सांगत काही विद्यार्थ्यांना बारा ते एकच्या सुमारास बाहेर बोलवलं. यावेळी तुम्ही तेव्हा का उभे राहिले नाहीत असे सांगून मारहाण केली, असेही विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.

झालेल्या प्रकाराबाबत कोणालाही सांगायचे नाही असा दम विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. हॉस्पिटलमधून विद्यार्थी विद्यालयात आल्यावर त्याची तक्रार प्राचार्यांकडे करण्यात आली. त्यावेळी झालेल्या प्रकार चुकीचा असून आम्ही ११ वीच्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणार असल्याचं प्राचार्यांनी म्हटलं. तसेच आता परीक्षा असल्यामुळे परीक्षेची तयारी करा असं आवाहन विद्यार्थ्यांना केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

SCROLL FOR NEXT