AYLIGHT SICKLE ATTACK IN PALGHAR: YOUNG WOMAN CRITICALLY INJURED NEAR GOLD CINEMA 
महाराष्ट्र

Palghar Crime: जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

Young Girl Attack In Palghar : पालघरमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला आहे. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. 'गोल्ड सिनेमागृहाजवळ ही घटना घडली आहे.

Bharat Jadhav

  • पालघरच्या गोल्ड सिनेमा परिसरात भरदिवसा तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला.

  • हल्लेखोराने मानेवर आणि कमरेवर वार करत गंभीर जखमी केले.

  • जखमी तरुणी महसूल खात्यात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती.

रुपेश पाटील, साम प्रतिनिधी

पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोराने तरुणीच्या मानेवर व कमरेवर सपासप वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली.

या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तातडीने उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी तिला पुढे शहरातील एका खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सदर तरुणी ही पालघरच्या महसूल खात्यात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड आणि पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पालघर पोलीस अधीक्षक तपास करीत आहेत.

संध्याकाळी नेमकं काय घडलं?

पालघरच्या गोल्ड सिनेमागृहाजवळ आज, शुक्रवारी सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सिनेमागृहाजवळच्या परिसरात स्नेहल सावंत या तरुणीवर अमोल नावाच्या तरुणाने कोयत्याने हल्ला केला. ती तरुणी जिल्हाधिकारी कार्यालयात काम करते. ती काम आटोपून या रस्त्याने जात होती. त्यावेळी आरोपीने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी पोहोचले.

गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात तातडीने नेण्यात आले. पालघरमध्ये उपचारानंतर पुढील उपचारासाठी पालघरला नेण्यात आले. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. प्राथमिक तपासानुसार, ही घटना प्रेमप्रकरणातून घडली असण्याची शक्यता आहे. लवकरच आरोपीला अटक करून चौकशीतून नेमका प्रकार उघड होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT